AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हाट्सअ‍ॅप मध्ये यावर्षी येताहेत 'हे' जबरदस्त फीचर्स!
गमतीदारमहाराष्ट्र टाइम्स
व्हाट्सअ‍ॅप मध्ये यावर्षी येताहेत 'हे' जबरदस्त फीचर्स!
व्हाट्सअ‍ॅप सध्या जगभरात कोट्यवधी युजर्सचा फेवरिट इंस्टेंट मेसेजिंग अ‍ॅप बनले आहे. लाँच नंतर व्हॉट्सअ‍ॅप लागोपाठ आपल्या युजर्संचा चॅटिंग मजा दुप्पट - तिप्पट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी नवीन-नवीन फीचर्स आणत आहे. गेल्यावर्षी कंपनीने बरेच नवीन फीचर्स आणले होते. आता या वर्षी सुद्धा कंपनी नवीन फीचर्स आणणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या अपकमिंग फीचर्स संबंधी जाणून घ्या. मल्टी डिव्हाइस सपोर्ट:- या फीचरचा युजर्संना खूप उत्सूकता लागली आहे. या फीचरमुळे युजर्संना एका अकाउंटवर चार डिव्हाइवर एकाच वेळी ऑपरेट करता येवू शकणार आहे. आता युजर आपल्या अकाउंटला एकाचवेळी एकत्रित केवळ मोबाइल आणि डेस्कटॉपचा वापर करू शकतात. या फीचरची टेस्टिंग गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये या फीचरला बीटा व्हर्जन मध्ये आयफोन वर पाहिले गेले आहे. व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉप अ‍ॅप वरून कॉलिंग:- युजर्ससाठी हे फीचर खूप जबरदस्त असणार आहे. या फीचरचा व्हॉट्सअॅपच्या कोट्यवधी युजर्संना उत्सकूता आहे. कंपनी या वर्षी विंडोज आणि मॅक ओएस साठी व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट रोलआउट करणार आहे. आता पर्यंत युजर्संना व्हॉट्सअ‍ॅप वेब वरून केवळ टेक्स्ट मेसेज आणि सिस्टममध्ये सेव्ह फाइल्स शेयर करू शकतात. कॉलिंगसाठी युजर्संना आता मोबाइलचा वापर करावा लागतो. व्हॉट्सअ‍ॅप इंन्शूरेन्स:- पेमेंट सर्विसला लाँच करण्यात आल्यानंतर आता व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्संसाठी यावर्षी इंन्शूरेन्स सर्विस आणणार आहे. ही सर्विस कंपनी एसबीआय आणि एचडीएफसी बँक पार्टनरशीप मध्ये ऑफर करणार आहे. रीड लेटर:- रीड लेटर सध्या आर्काइव्ड चॅट्सच्या अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे. कोणत्याही चॅटच्या रीड लेटरमध्ये मूव्ह करण्यासाठी त्यात व्हॉट्सअ‍ॅपच्या नोटिफिकेशन्स येणार नाहीत. तसेच यात युजर्संला व्हेकेशन मोडचे फीचर सुद्धा मिळणार आहे. रीड लेटरमध्ये सेटिंग्सला कस्टमाइज करण्यासाठी एडिट बटन सुद्धा देण्यात येणार आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- महाराष्ट्र टाइम्स . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
6
3