कृषि वार्तालोकमत
व्वा! ऊस उत्पादकांना मिळणार ११०० कोटी...😊✌️
केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या निर्यात अनुदान योजनेतील ६० लाख टनांपैकी सुमारे १८ लाख टन साखरेचा निर्यात कोटा महाराष्ट्राच्या वाट्याला येईल. या निर्यातीची लक्ष्यपूर्ती झाल्यास राज्यातील ऊस उत्पादकांना सुमारे ११०० कोटी रुपये मिळू शकतील. केंद्र सरकारने गतवर्षीपेक्षा निर्यात अनुदानाला कात्री लावली असून, प्रतिकिलो सहा रुपये अनुदान मिळणार आहे. गेली दोन वर्षे साखर उद्योग विविध अडचणींतून जात आहे. उसाची वाढलेली एफआरपी आणि बाजारातील साखरेच्या दरामुळे कारखान्यांचे अर्थकारण बिघडले आहे. केंद्र सरकारने मागील गळीत हंगामात साखर निर्यातीचे धोरण घेतले होते. त्यासाठी कारखान्यांना टनाला एक हजार ४४८ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. गतवर्षी प्रतिकिलो १० रुपये ४५ पैसे अनुदान होते; मात्र यंदा सहा रुपये दिले जाणार आहे. कमी का असेना, अनुदान देऊन सरकारने साखर उद्योगाला दिलासा दिला. मात्र साखरेच्या किमान दराबाबत निर्णय अपेक्षित होता, असे साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे यांनी सांगितले. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
34
8
इतर लेख