AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्यवसाय सुरू करायचाय? घ्या १० लाख रुपये!
समाचारलोकमत
व्यवसाय सुरू करायचाय? घ्या १० लाख रुपये!
➡️ कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांना व्यवसायात तोटा सहन करावा लागला आहे. काहींनी उमेदीने सुरू केलेला व्यवसाय डबघाईला आला आहे. अशा स्थितीत या सर्वांना धीर देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना लाभदायक ठरत आहे. काय आहे योजना ? ➡️ पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पंतप्रधान मुद्रा योजना (पीएमएमवाय) सुरू केली. बँकांचे नियम पूर्ण करू शकत नसल्याने ज्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळत नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे. ➡️ तसेच ज्यांच्याकडे स्वत:चा लघुउद्योग आहे किंवा भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याइतपत आवश्यक कागदपत्रे आहेत, त्यांनाही या योजनेंतर्गत कर्ज घेता येते. कर्ज कोणाला मिळू शकते? ➡️ छोट्या आकाराचे असेम्ब्लिंग युनिट, सर्व्हिस सेक्टर युनिट, छोटे दुकानदार, फळ वा भाजी विक्रेता, ट्रकचालक, खाद्यपदार्थांची विक्री करणारे, दुरुस्तीची दुकाने चालवणारे, लघु उद्योजक, अन्नप्रक्रिया उद्योजक इत्यादींना पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. ➡️ पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत कोणतीही सरकारी बँक, ग्रामीण बँक, सहकारी बँक, खासगी बँक वा विदेशी बँक यांच्याकडून कर्ज घेता येऊ शकते. या बँकांना पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत कर्ज देण्याची परवानगी दिली आहे. कुठे मिळेल कर्ज ? अधिक माहिती mudra.org.in या संकेतस्थळावर मिळू शकते. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- lokmat, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
89
11
इतर लेख