AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वेळीच रोखा दुधाळ जनावरांतील कासदाह आजार
पशुपालनअॅग्रोवन
वेळीच रोखा दुधाळ जनावरांतील कासदाह आजार
कासदाह कासदाह म्हणजे कासेला येणारी सूज'' तर वैज्ञानिक दृष्ट्या पाहिले तर कासदाह म्हणजे भौतिक, रासायनिक आणि जैविक कारणांमुळे कासेवर सूज येणे आणि त्याचबरोबर गाई व म्हशी दूध देण्याचे पूर्ण थांबणे किंवा दूध उत्पादन कमी होणे. हा आजार फक्त कासेवरील येणाऱ्या सुजेशी मर्यादित नसून जनावराला तात्पुरत्या स्वरुपात अनुत्पादक बनवतो आणि जर वेळेवर उपचार केले नाहीत तर जनावरे कामयचे अनुत्पादक बनतात. त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी गोठ्याचे योग्य व्यवस्थापन ठेवा
आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना गोठ्याची स्वच्छता जनावरांचा गोठा आणि आसपासचा परिसर जंतुनाशकाने वेळोवेळी स्वच्छ करावा. शेण साठविण्याकरता केलेला खड्डा हा गोठ्यापासून ५० मीटर अंतरावर असावा. एखाद्या जनावराला इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे. त्या जनावराचे दूध सर्वात शेवटी काढावे. जनावरांची स्वच्छता जनावरांना दररोज स्वच्छ केल्याने किंवा धुतल्याने अंगावर जमा होणारी धुळ आणि शेण काढले जाते. त्यामुळे स्वच्छ दुध उत्पादन होते. योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होतो. दुध काढण्यापूर्वी जनावराची कास स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ कापडाने पुसावी. कास धुण्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर करावा. दूध यंत्राची स्वच्छता दूध काढण्यासाठी दुधयंत्राचा वापर केला जात असेल तर यंत्र वेळेवर स्वच्छ करावे. धार काढण्याची पद्धत जनावरांचे दूध काढताना पूर्ण हात पद्धतीचा अवलंब करावा. आंगठ्याने किंवा चिमटीने धार काढल्यास जनावरांच्या सडाला इजा होण्याची शक्यता असते. जखेमीत जंतूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. गाभण जनावरांना योग्य पद्धतीने आटविणे जनावरांना आटविणे म्हणजेच त्यांचे दूध काढणे बंद करणे. असे सामान्यतः जनावर गाभण असण्याच्या आठव्या महिन्यामध्ये केले जाते. जास्त दूध देणाऱ्या जनावरांना आटविताना धार काढणे लगेच थांबवू नये. त्यामुळे कासदाह होण्याची शक्‍यता जास्त असते. संदर्भ-अग्रोवन ४ ऑक्टो १७
81
0