AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वेलवर्गीय भाज्या
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वेलवर्गीय भाज्या
वेलवर्गीय वनस्पतींची फुले द्विलिंगी असतात, म्हणजे नर आणि मादी पुष्पे वेगवेगळी असतात पण एकाच वेलीवर येतात. अशा फुलांचे परागीभवन मुख्यत: कीटकांमार्फत होते. वेलवर्गीय प्रजातीच्या मुख्य भाज्या कलिंगड, खरबूज, भोपळा, घोसाळे, दुधीभोपळा, कोहळा, पडवळ, काकडी, ढेमसे, कारले इ. आहेत. हवामान आणि जमीन: 25 ते 30 अंश सेल्शियस तापमानात वेलींची वाढ अधिक चांगली होते. या भाज्यांवर मुख्यत: हिमाचा जास्त परिणाम होतो. पाण्याचा चांगला निचरा होणारी लोमी माती यांच्यासाठी चांगली असते. उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात दोन्ही हंगामात लागवड केली जाते.
पेरणीचा हंगाम: कलिंगड, खरबूज आणि काकडी फेब्रुवारी-मार्च महिन्यात; घोसाळे, दुधीभोपळा, भोपळा, कारले आणि ढेमसे यांची लागवड फेब्रुवारी-मार्चमध्ये उन्हाळी पीक म्हणून आणि जून-जुलै मध्ये पावसाळी पीक म्हणून करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. रोगांच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी, बियाण्यावर थायरम @ 2 ग्रॅम प्रती किग्रॅची बीजप्रक्रिया करावी. पेरणीची वेळ या भाज्या नदीजवळच्या भागात किंवा सपाट प्रदेशात लावल्या जात आहेत, यावर अवलंबून असते. पीक लवकर लावण्यासाठी खालील उपाययोजना करता येतात. 20 अंश सेल्शियसपेक्षा कमी तापमानात बियांचे अंकुरण योग्यप्रकारे होत नसल्याने, बिया थेट शेतात लावू नयेत तर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लावाव्यात. 1/3 भाग मऊ माती, 1/3 भाग वाळू आणि 1/3 भाग शेणात बिया मिसळा. एका पिशवीत 2 बिया लावता येतील. पिशव्यांना प्लास्टिकचे आच्छादन घाला. योग्य तापमानाला बिया प्रक्रिया केलेल्या शेतात पेरा. बिया थेट शेतात पेरण्यासाठी , त्या 24 तास भिजवून ठेवा. पेरण्यापूर्वी बिया 24 तासात पोत्यात ठेवा. योग्य तापमानाला बिया पेरल्यामुळे अंकुरणाची प्रक्रिया अधिक जलद होते. त्यानंतर, बिया शेतात पेरता येतात. त्यामुळे अंकुरणाच्या प्रमाणात वाढ होते.
190
0