आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वेलवर्गीय पिकांमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव!
भुरी या रोगाची सुरवात प्रथम जुन्या पानापासून होते. पानाच्या दोन्ही पृष्ठभागांवर पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. प्रादुर्भाव झालेली पाने पिवळी पडून करपतात आणि वेली वाळतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास या बुरशीमुळे पाने भुरकट पडतात. हा रोग देठ, खोड आणि फळांवरही पसरतो. यामुळे वेलींची वाढ खुंटते. याच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५०% डब्ल्यूपी @१२० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
111
9
संबंधित लेख