AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वेगाने धावणारी इलेक्ट्रिक सायकल!
ऑटोमोबाईलAgrostar
वेगाने धावणारी इलेक्ट्रिक सायकल!
➡️मित्रांनो याआधी आपण इलेक्ट्रिक बाइकबद्दल ऐकलं असेल. पण इलेक्ट्रिक सायकल देखील असते. हे चकित करणारे आहे ना? चला तर मग आपण आज या लेखात माहिती घेऊया अशाच एका इलेक्ट्रिक सायकलबद्दल.हि सायकल "जि.एम.सी. हमर" या कंम्पनी ने आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. 🏍️जि.एम.सी. हमर सायकलची वैशिष्ठये: 🏍️कंपनीने या इलेक्ट्रिक सायकलला जि.एम.सी. हमर इलेक्ट्रिक ऑल व्हील ड्राईव्ह ई बाईक असे नाव दिले आहे, त्याची वैशिष्ट्ये देखील एखाद्या वाहनापेक्षा कमी नाहीत. 🏍️यामध्ये तुम्हाला तुमच्या गरजेनुसार ऑल व्हील ड्राइव्हची सुविधाही देण्यात आली आहे. 🏍️या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 1 kWh बॅटरी पॅकसह दोन हब मोटर्स देखील मिळतात. या मोटरचे वैशिष्टय़ म्हणजे जेव्हा दोन्ही मोटर्स एकत्र चालवले जातात तेव्हा ते सुमारे 160 Nm टॉर्क जनरेट करते. 🏍️ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनीने दोन हायड्रॉलिक डिस्क ब्रेक, रुंद टायर आणि फ्रंट सस्पेन्शन फोर्क दिला आहे, ज्यामुळे तुमचा प्रवास आरामदायी होतो. 🏍️जर तुम्ही या इलेक्ट्रिक सायकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला $4,000 खर्च करावे लागतील, जे भारतीय किंमतीच्या तुलनेत सुमारे 3.30 लाख रुपये आहे. ➡️संदर्भ :Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
5