नोकरीAgrostar
१०वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी!
👉🏼सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे.मध्य रेल्वेने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज करावा लागेल.
👉🏼अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 सप्टेंबर 2023
👉🏼वयोमर्यादा : 15 - 24 वर्ष
👉🏼पात्रता: 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
आयटीआय डिप्लोमाही असावा.
👉🏼भरली जाणारी पदे : 2409
👉🏼ही पदे शिकाऊ उमेदवारांची आहेत, ज्याअंतर्गत मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर क्लस्टरमध्ये भरती केली जाणार आहे.
👉🏼जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही परीक्षेला जाण्याची गरज नाही. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. याशिवाय कागदपत्रांची पडताळणीही केली जाणार आहे. एवढेच नाही तर उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही करावी लागणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्याला दरमहा 7 हजार रुपये स्टायपेंड म्हणून दिले जातील.
👉🏼सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना या रिक्त पदांसाठी 100 रुपये खर्च करावे लागतील. तर SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना एक रुपयाही भरावा लागणार नाही. हे लोक मोफत अर्ज करू शकतील.
👉🏼संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.