AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
१२ वी पास उमेदवारांनो .काळजी नको !!८१,१०० रुपयापर्यंत पागार मिळावा .
नोकरीAgrostar
१२ वी पास उमेदवारांनो .काळजी नको !!८१,१०० रुपयापर्यंत पागार मिळावा .
नमस्कार का तुम्ही आर्मी किंवा पोलीस भरती साठी तयारी करताय ? तर हि तुमच्या साठी खूप आनंदाची बातमी आहे. ITBP अर्थात इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये एकूण 248 पदांसाठी भरती होत आहे. एकूण 248 पदांपैकी 90 पदांवर ITBP मध्ये आधीच कार्यरत असलेल्या उमेदवारांची भरती केली जाईल. उर्वरित 158 जागांसाठी उमेदवार थेट अर्ज करू शकतील. ➡️रिक्त जागांचा तपशील एकूण 248 पदांपैकी 90 पदांवर ITBP मध्ये आधीच कार्यरत असलेल्या उमेदवारांची भरती केली जाईल. उर्वरित 158 जागांसाठी उमेदवार थेट अर्ज करू शकतील. 158 पदांमध्ये 135 पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत. महिला उमेदवारांसाठी 23 पदे आहेत. यासोबतच 158 पदांपैकी 65 पदे अनारक्षित असून 26 पदे अनुसूचित जाती (SC), 23 पदे अनुसूचित जमाती (ST), 28 पदे ओबीसी (OBC) आणि 16 पदे EWS प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. ➡️वयोमर्याद अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असावी. यासोबतच SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात पाच वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट असेल. ➡️शैक्षणिक पात्रताभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 12वी पास असणे आवश्यक आहे. (ITBP Recruitment 2022) 35 शब्द प्रति मिनिट या वेगाने इंग्रजी टायपिंग किंवा 30 शब्द प्रति मिनिट या वेगाने हिंदी टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ➡️मिळणारे वेतनपरीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रुपये पगार दिला जाईल. ➡️अर्ज करण्यासाठी उमेदवारांना recruitment itbpolice.nic.in या संकेतस्थळावर माहिती मिळेल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झालेली असून 7 जुलै 2022 पर्यंत अर्ज करता येईल. ➡️ संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
15
इतर लेख