AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
१०वी ते इंजिनीअरिंगपर्यंत सर्वांना सरकारी नोकरीची संधी!
नोकरी महाराष्ट्र टाइम्स
१०वी ते इंजिनीअरिंगपर्यंत सर्वांना सरकारी नोकरीची संधी!
➡️ कोल इंडिया या भारत सरकारच्या कंपनीत नोकरी मिळण्याची संधी आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाने वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. हा कोल इंडियाचा उपक्रम असून वेस्टर्न कोलफील्ड अप्रेंटिस पदांसाठी भरती केली जाणार आहे. आयटीआय प्रमाणपत्र कोर्स करणाऱ्या तरुणांपासून ते डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या उमेदवारांपर्यंत सर्वजण या सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात. रिक्त पदाचा तपशील १) अप्रेंटिस - ९६५ पदे २) तंत्रज्ञ अप्रेंटिस - २१५ पदे ३) पदवीधर प्रशिक्षणार्थी - १०१ पदे ४) एकूण पदांची संख्या - १२८ ५) ट्रेड्समध्ये अप्रेंटिस साठी रिक्त जागांचा तपशील ६) ड्रॉट्समन (सिव्हिल) - २८ ७) संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक - २१९ ८) इलेक्ट्रिशियन - २५० ९) फिटर - २४२ १०) मेकॅनिक (डिझेल) - ३६ ११) मशीनिस्ट - १२ १२) मेसन - ०९ १३) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक - १६ १४) सर्वेयर - २० १५) टर्नर - १७ १६) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) - ७६ १७) वायरमन - ४० कोण अर्ज करू शकतो? ऑप्रेटिंगसाठी दहावीनंतर एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय कोर्स केलेले तरुण अर्ज करू शकतात. तर टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी माइनिंग किंवा माइनिंग सर्वेक्षणातील पूर्णवेळ डिप्लोमा आवश्यक आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थीसाठी माइनिंग इंजिनीअरिंगमध्ये BE किंवा B.Tech ची पूर्णवेळ पदवी आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी पोर्टल (NATS पोर्टल) वर नोंदणी करणे आवश्यक आहे. असा करा अर्ज कोल इंडिया अप्रेंटिस भरती २०२१ साठी उमेदवारांना वेस्टर्न कोल वेबसाइट Westerncoal.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया ०६ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२१ आहे. अशी होईल निवड या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारेच नोकरी मिळेल. यामध्ये पात्रता परीक्षा आणि इतर पात्रता परीक्षांचे गुण पाहिले जातील. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- महाराष्ट्र टाइम्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
20
इतर लेख