AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वीज बिल न आकारणारी सरकारने आणली ‘ही’ योजना !
योजना व अनुदानAgrostar
वीज बिल न आकारणारी सरकारने आणली ‘ही’ योजना !
➡️वाढती महागाई आणि आर्थिक मंदीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.महागाईची चणचण सरकर पासून सामान्य नागरिकांना सोसावीच लागते. त्यातच विजेचे बिल देखील नको तितके येते. यामुळे सामान्य नागरिकाचे आर्थिक बजेट ढासळते. यावरच उपाय म्हणून सरकारने नवीन स्कीम आणली आहे. 2030 पर्यंत प्रत्येक घरात अपारंपरिक पद्धतीने वीजनिर्मिती केली जाणार आहे. ➡️काय आहे ही वीजबिल वाचवणारी सरकारची योजना :आजकाल प्रत्येक नागरीकांना विजेबिलाचे आकडे ऐकून झटके बसत आहेत. त्यामुळे 2030 पर्यंत 40℅ वीज ही अपारंपरिक पध्दतीने निर्माण करायचे उद्दिष्ट सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे. यातून शिल्लक असलेल्या विजेची विक्री करणे आणि विजेची गरज भागवणे अशा दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत. ➡️सौर पॅनलच्या मदतीने आपण किती वीज वापरू शकतो : 2030 पर्यंत 100 गिगा व्हॅट एवढ्या क्षमतेने विज उत्पादन करण्याचे सरकारचे नियोजन आहे. या यंत्रणेमुळे तुम्ही घरातील 1 एसी, 3-4 पंखे, 5-7 एलईडी बल्ब किंवा लाईट्स, फ्रिज, टीव्ही, इतर मशिनरी सहज वापरू शकता. एक घरासाठी 2-4 kw क्षमतेचे पॅनल पुरेसे ठरतात. प्रत्येक महिन्याला 4 हजाराच बिल वाचेल आणि याचा हिशोब केला तर 2.5 वर्षाच्या आत तुमचा खर्च सहज निघेल. ➡️सौर पॅनल बसवण्यासाठी येणारा खर्च : या सगळ्या गोष्टींसाठी एकूण खर्च 1 लाख 88 हजार एवढा येतो परंतु सरकार अनुदान (subsidy) देत असल्यामुळे त्याची किंमत 1लाख 26 हजारापर्यंत जाते. 2kw ची पॅनल बसवले तर खर्च 1 लाख 20 हजारापर्यंत याचा खर्च जातो. सरकार कडून सौर पॅनल बसवण्यासाठी सुमारे 48000 चे अनुदान मिळते. सरकारकडून मिळणाऱ्या या 40℅ पर्यंतच्या अनुदानामुळे तुमचा कमी खर्च कमी होतोच पण याबरोबरच तुमचे वीजबिल देखील वाचते. ➡️संदर्भ :-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
91
17
इतर लेख