AgroStar
१०वि पास उमेदवारांनो, ही संधी सोडू नका! आजच अर्ज करा!
नोकरीन्यूज १८ लोकमत
१०वि पास उमेदवारांनो, ही संधी सोडू नका! आजच अर्ज करा!
➡️ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपुर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे.पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 असणार आहे. ➡️ या पदांसाठी भरती अपरेंटिस इलेक्ट्रीशियन - एकूण जागा 53 ➡️ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अपरेंटिस इलेक्ट्रीशियन या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी कोणत्याही ITI संस्थेतून ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी इलेक्ट्रिकल ट्रेडमधून ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. ➡️ वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे वयवर्षे १८ ते ३८ च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार उमेदवारांनी सूट देण्यात येणार आहे. ➡️ ही कागदपत्रं आवश्यक 1)Resume (बायोडेटा) 2)दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं 3)शाळा सोडल्याचा दाखला 4)जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) 5)ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) 6)पासपोर्ट साईझ फोटो या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahatransco.in/ या लिंकवर क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
17
इतर लेख