AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड!
नोकरीmahrashtra times
विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड!
➡️ ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीतून होणार आहे. रिक्त पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. ➡️ आरोग्य निरीक्षक पदाच्या दोन जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी शासनमान्य संस्थेतील स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात काम केल्याचा ३ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.निवड झालेल्या उमेदवारास २५ हजार रुपये दरमहा पगार देण्यात येणार आहे. ➡️ सीएसएसडी सहायक पदाच्या तीन जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी उमेदवार शासनमान्य संस्थेतून ITI मशिनिस्ट, NCTVT परीक्षा उत्तीर्ण आणि बारावी पास असणे गरजेचे आहे. शासकीय किंवा निमशासकीय संस्थेतCSSD विभागात काम केल्याचा २ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी २० हजार रुपये प्रतिमहा पगार दिला जाणार आहे. ➡️ औषध निर्माण अधिकारी पदाच्या ३ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून डीफार्मा, बीफार्मा कोर्स तसेच शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात काम केल्याचा ३ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पादासाठी उमेदवारास १५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. ➡️ नाभिक पदाची एक जागा भरली जाणार आहे. यासाठी ८ वी पास आणि शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात काम केल्याचा १ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.यासाठी १५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. ➡️ खुल्या वर्गासाठी ३८ वर्ष आणि मागासवर्गासाठी ४३ वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. उमेदवारांना सर्व कागदपत्रे दोन प्रतीमध्ये सादर करावी लागतील. कागदपत्रे नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. यासोबतच शैक्षणिक आर्हता आणि अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. ➡️ इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता राजीव गांधी मेडिकल कॉलेज व छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा, ठाणे या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. सकाळी ११.३० वाजता मुलाखत सुरु होणार आहेत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-Maharashtra times, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
7
इतर लेख