योजना व अनुदानAgrostar
विमा योजना दावे होणार आता मंजूर!
➡️स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू जसे की, अंगावर वीज पडणे, रस्ते अपघात किंवा विहिरीत पडून मृत्यू किंवा सर्पदंश या व इतर कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो व अशा परिस्थितीमुळे जर शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर अशा शेतकरी पश्चात त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा तसेच दुसरी महत्वाची बाब म्हणजे अपघातामध्ये शेतकऱ्याला कायमचे अपंगत्व आले तर अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.
➡️ या योजनेसंदर्भात 2021 मध्ये जो काही शासन निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार मार्च 2022 पर्यंत योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली होती. त्यानुसार 2022-23 साठी ही योजना सात एप्रिल 2022 सुरू होणे आवश्यक होते परंतु काही प्रशासकीय कारणांमुळे ही योजना राज्यात राबवण्यासाठी मंजुरी मिळाली नव्हती. या कालावधीमध्ये राज्यात ही योजना राबवण्यास मंजुरी नसल्यामुळे हे दावे प्रलंबित होते. त्यामुळे वारंवार यासंदर्भातल्या तक्रारी शासनाला प्राप्त होत होत्या. त्यामुळे हे दावे मंजूर करण्यासाठी शासनाने एक निर्णय घेतला आहे.
➡️ शासन निर्णय :
या शासन निर्णयानुसार आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत प्रशासकीय कारणामुळे 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 या कालावधीत खंडित कालावधी म्हणून घोषित करण्यास तसेच या कालावधीमध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आले अशा शेतकऱ्यांचे पात्र विमा दावे मंजूर करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
➡️या कालावधीतील प्राप्त विमा दावे मंजूर करण्यासाठी कृषी आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या खंडित कालावधीतील दावे तपासून त्यांच्यातील पात्र अपात्रतेबाबत सखोल व काळजीपूर्वक तपासणी करून उपसंचालक यांनी करावी अशा प्रकारचे सूचना देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
➡️या सगळ्यात छाननीनुसार ज्या काही यादी तयार करण्यात येईल त्या यादीप्रमाणे दाव्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना देण्याअगोदर नेमण्यात आलेल्या समितीने या यादीची फेर तपासणी करावी अशा प्रकारचे सूचना देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
➡️संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.