AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
विधवा शेतकरी महिलांना मिळणार मोफत खते व बियाणे !
कृषी वार्ताAgrostar
विधवा शेतकरी महिलांना मिळणार मोफत खते व बियाणे !
☑️कोरोना काळात राज्यात विधवा झालेल्या एकल शेतकरी महिलांना त्यांच्या गरजेनुसार येत्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये मोफत खते आणि बियाणे देण्यासंदर्भात लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. विधान भवनामध्ये विधान परिषद उपसभापती कार्यालयात डॉ. नीलम गोर्‍हे यांच्याशी त्यांनी गुरुवारी (ता.२६) संवाद साधला. यावेळी त्यांनी ही भुमिका स्पष्ट केली. ☑️राज्यातील एकल महिलांना येत्या पावसाळ्यापूर्वी मोफत खते आणि बियाणे देण्याची मागणी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये होत आहे. कोविड काळातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील जवळजवळ वीस जिल्ह्यांमध्ये डॉ. नीलम गोर्‍हे यांनी आढावा बैठक घेतली आहे. ☑️या बैठकीमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी व कोविड मधील एकल महिलाच्या कुटुंबांवर आलेल्या संकटाचा विचार करता, त्यांना बी-बियाणे आणि खते राज्य शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी विनंती कृषिमंत्री यांच्याकडे केली आहे. यावर त्यांनी याबाबत योग्य त्या कार्यवाही करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. ☑️संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
13
इतर लेख