सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
विद्राव्य खते ठिबक व फवारणीतून देण्याचे महत्व आणि फायदे!
फर्टिगेशनचे फायदे - • मजूर, पाणी व खते यांची बचत होते. • पिकाच्या मुळापाशी गरजेनुसार योग्य अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात देता येते. • विद्राव्य द्रवरूप खते बहुतांशी आम्लधर्मीय असून, क्षारभार कमी असणारी आहे. ही खते सोडिअम व क्‍लोरिनमुक्त असल्याने जमिनीच्या गुणधर्मावर अनिष्ट परिणाम होत नाही. • फर्टिगेशन तंत्रामुळे पाणी वापर कार्यक्षमता ४० ते ५० टक्के, खत वापर कार्यक्षमता २५ ते ३० टक्के वाढते. जमिनीची सुपीकता टिकून उत्पादनात वाढ होते. • पिकाची वाढ जोमाने झाल्याने रोगांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते. • पिकाच्या वाढीनुसार खते देता येतात. • खते विभागून जमीन, पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात. विद्राव्य खते द्या फवारणीद्वारे : • साधारणतः पानांत असलेल्या अन्नद्रव्याच्या पातळीवर पिकांची उत्पादनक्षमता ठरते. पीकवाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत त्यांची गरज वेगळी असते. त्यानुसार संतुलित प्रमाणात ही अन्नद्रव्ये पुरवल्यास पिकांची वाढ चांगली होते. फवारणीद्वारे विद्राव्य खते दिल्यास ती त्वरित वनस्पतींना उपलब्ध होतात. त्यामुळे कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी फवारणी हा मार्ग उपयुक्त ठरतो. विद्राव्य खते घन व द्रवरूप स्वरूपात उपलब्ध असून, वाहतूक, साठवणूक आणि वापरणे सुलभ ठरते. त्यांच्या किमती पारंपरिक खतांच्या तुलनेत अधिक आहेत. मात्र त्यांची गुणवत्ता आणि उपयुक्तता लक्षात घेता फायदेशीर ठरू शकतात. फवारणीतून खते देण्याचे उद्देश - • पिकांना उदिप्त करून त्यांची उत्पादन प्रक्रिया वाढविणे. • अतिवृष्टीमुळे किंवा सतत पाऊसमानामुळे जमिनीतील खते वाहून जातात. तसेच पाणी साचल्यामुळे कार्यरत मुळे कार्यरत नसतात. अशा वेळी काही वेळ पाऊस थांबला असता फवारणीमधून खते देता येतात. ती पिकांना त्वरित उपलब्ध होतात. • जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा अशा परिस्थितीत फवारणीद्वारे खतांची पूर्तता करता येते. सायंकाळी अशी खते दिल्यास पाने कार्यरत राहतात. पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
12