AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वासरांमधील रोटा विषाणू, काय आहे यावर उपाय!
पशुपालनAgroStar
वासरांमधील रोटा विषाणू, काय आहे यावर उपाय!
👉🏻वासरांमधील रोटा विषाणू हगवण हा महत्त्वाचा आजार आहे. साधारणतः हा आजार जानेवारी ते जून या काळात दिसतो. थंडी संपून उन्हाळ्यास सुरुवात होत असताना नवजात वासरांमध्ये आणि काही अंशी मोठ्या वयाच्या जनावरांमध्ये हा आजार दिसतो. हा पचनसंस्थेशी निगडित आजार आहे. एक ते दोन महिन्यांच्या वासरांपासून तीन वर्षांच्या वासरांमध्ये या विषाणूंचा धोका असतो.चार आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांमध्ये हा आजार आढळतो. प्रथमतः संसर्गित झालेली वासरे या आजाराची लक्षणे दाखवतात. परंतु दुसऱ्या वेळेस संसर्ग किंवा प्रौढावस्थेत आजाराचा प्रादुर्भाव झाला तर तो तेवढा धोकादायक नसतो. 👉🏻रोटा विषाणूचा प्रसार: - आजार मानवासह इतर प्राण्यांमध्ये देखील आढळतो. गोठ्यातील अस्वच्छता हे संसर्गाचे मुख्य कारण आहे. - जन्मतः हा आजार वासरात आढळून येत नाही. संसर्गित जनावरांची हगवण/ अतिसारामार्फत प्रसार होतो. - गोठ्यातील संक्रमित वस्तू, दावण, गव्हाणी मार्फत देखील विषाणू प्रसारित होऊ शकतो. - सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, गोठ्यातील अस्वच्छता, निर्जंतुकीकरणाचा अभाव, गोठ्यातील संचारासाठी अपुरी जागा आणि सूर्यप्रकाशाचा अभाव या कारणामुळे आजार पसरण्याचे प्रमाण वाढते. 👉🏻रोटा विषाणू वरील उपाययोजना: - आजारावर ठोस उपाय नाही. तज्ज्ञ पशुवैद्याकडून वासरांमधील लक्षणावर उपचार करून आजाराचा धोका कमी करू शकतो. - जिवाणूवर प्रतिजैविकांचा योग्य वापर करून संभाव्य धोक्यांपासून वासरू वाचवता येते. - वासरांमधील पाणी आणि क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे. - संसर्गित वासराला निरोगी जनावरांपासून दूर करून विलगीकरण करावे. - बाधित जनावरांचा परिसर निर्जंतुकीकरण केलेला असावा. - सर्वप्रथम गोठ्यातील जागा, जमीन गव्हाण, भिंती, फरशी स्वच्छ झाडून गरम पाण्याने धुऊन कोरडी करावी. शेणाचे डाग, वाळलेले शेण खरवडून काढावे आणि झाडून घ्यावे. त्यानंतर १ टक्का फॉर्मॅलिनचे द्रावण किंवा २ टक्के फिनॉल द्रावण बनवून ते संपूर्ण गोठ्यात फवारावे. -निर्जंतुकीकरणानंतर १५ मिनिटांनी पुनः एकदा गरम पाण्याने संपूर्ण परिसर धुऊन कोरडा केल्यानंतर जनावरे गोठ्यात घ्यावीत. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख