AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वासरांची वाढ खुंटण्याची कारणे अन् उपाययोजना!
पशुपालनअ‍ॅग्रोवन
वासरांची वाढ खुंटण्याची कारणे अन् उपाययोजना!
वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक इ. प्रथिनयुक्त खाद्याचा वापर केल्यास वासरांची वाढ जोमाने होते. वासरांच्या आहारात वयोमानानुसार द्विदल, एकदल चारा, वाळलेला चारा, पशुखाद्य यांचा पशुवैद्यकांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात वापर करावा. वासरांची वाढ खुंटण्याची कारणे - जन्मण्यापूर्वी गर्भाशयातील कमी वाढ गाभणकाळातील अपुऱ्या / निकृष्ट आहारामुळे गर्भाशयातील वासरू अशक्त राहते. अशी जन्मलेली वासरे पुढेही जलदगतीने वाढत नाहीत. जन्मल्यानंतर अपुरे दूध/चीक पाजणे - जन्मानंतर वासरांसाठी सर्वोत्तम आहार म्हणजे त्याच्या आईपासून मिळणारा चीक व दूध. वासरांना गरजेनुसार चीक व दूध न पाजल्यास वाढ खुंटते. वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक यांचा वापर न करणे- आपल्याकडील बहुतांशी पशुपालकांकडे निकृष्ट चारा उपलब्ध असतो आणि केवळ अशा चाऱ्यावर वासरांची पूर्ण क्षमतेने वाढ होत नाही. वासरांच्या जलद वाढीसाठी प्रथिनयुक्त आहाराची गरज असते. वासरांना आंतरपरोपजीवीचा प्रादुर्भाव वासरांच्या शरीरातील जंत वासराचे रक्त पितात, वासराने पचवलेले अन्न खातात, अवयवांमध्ये बाधा निर्माण करतात. आतड्यांना इजा करतात त्यामुळे पचवलेले अन्नसुद्धा वासरांच्या शरीरात नीट शोषले जात नाही, परिणामी वाढ खुंटते. बाह्यपरोपजीवींचा प्रादुर्भाव - बाह्यपरोपजीवी म्हणजे गोचिड, पिसवा, उवा वासराचे रक्त पिऊन वाढतात. तसेच यांच्या दंशामुळे वासरू नेहमी बेचैन राहते. त्यामुळे चारा खाण्यावरील लक्ष कमी होऊन त्यांचे कुपोषण होऊन वाढ खुंटते. वासरांना मोठ्या वासरांसोबत, गाई/ म्हशींसोबत ठेवणे - वासरे गाई/ म्हशी लहान वासरांना चारा, खाद्य खाऊ देत नाहीत त्यामुळे त्यांचे कुपोषण होऊन वाढ खुंटते. वासरांना एकेठिकाणी दोरीने बांधणे यामुळे या वासरांच्या शरीरावर एक प्रकारचा सतत ताण येतो. शरीराचा व्यायाम न झाल्यामुळे पचनक्षमता कमी होऊन वाढ खुंटते. गोठा, सभोवतालची दलदल, अस्वच्छ वातावरण यामुळे वासराला नेहमी श्‍वसनाचे आजार होतात, हगवण लागते. त्यामुळे वासरांची वाढ खुंटते. वासरांना कमी पाणी पाजणे वासरे चांगल्याप्रकारे चारा खाऊ लागल्यानंतर, चारा पचवण्यासाठी वासरांनी मुबलक पाणी पिणे गरजेचे असते. जवळ जवळ १ किलो चारा पचवण्यासाठी ४ ते ५ लिटर पाण्याची गरज असते. परंतु वाढत्या पाण्याच्या गरजेकडे दुर्लक्ष होऊन वासरांची वाढ खुंटते. आहारात एकदलीय/ द्विदलीय चाऱ्याचा अपुरा वापर - वाढत्या शरीराची पोषणतत्त्वाची गरज दिवसेंदिवस वाढत असते. त्यानुसार वासरांच्या आहारात योग्य बदल होणे गरजेचे असते, जसे की एकदलीय व द्विदलीय चारा पिकांचा ५० टक्के आणि ५० टक्के वापर करणे, योग्य प्रमाणात पशुखाद्याचा वापर करणे. बहुतांशी वासरांच्या आहारात वाढीनुसार बदल होत नाहीत म्हणून वासरांची वाढ खुंटते. कातडी, पोट, आतड्याचे आजार यामध्ये वासरांचे कुपोषण होऊन वासरांची वाढ खुंटते. गोठ्यातील अपुरी जागा वासरांना खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, बसण्यासाठी, फिरण्यासाठी योग्य प्रमाणात जागा उपलब्ध होत नाही. याचा परिणाम होऊन वासरांची वाढ खुंटते. वासरांच्या आहारात क्षार मिश्रणाचा अभाव - वासराच्या शारीरिक वाढीसाठी खनिजसत्त्व महत्त्वाची असतात. पचनक्रिया सुरळीत राहणे व पचलेले अन्न शोषण्यासाठी क्षारांची गरज असते. वासरांच्या आहारात क्षाराचा अभाव झाल्यास वाढ खुंटते. आनुवंशिकता काहींची वाढही आनुवंशिकतेने कमी असू शकते. परंतु असे प्रमाण खूप कमी असते. उपाययोजना:- • जन्मताच वासरू सशक्त राहण्यासाठी गाई- म्हशींना गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात हिरवा (एकदल व द्विदल) चारा, खुराक गरजेनुसार द्यावा. यामुळे गर्भाशयातील वासरांची उत्तम वाढ होऊन सशक्त वासरू जन्मते. जन्मानंतर योग्य आहार व्यवस्थापन केल्यास त्यांची चांगली वाढ होते. • वासरांची रोगप्रतिकारक्षमता चांगली राहण्यासाठी व उत्तम वाढीसाठी वासरांना चीक वजनाच्या १० टक्के व दूध वजनाच्या १० ते १५ टक्के पाजणे गरजेचे असते. • वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक इ. प्रथिनयुक्त खाद्याचा वापर केल्यास वासरांची वाढ जोमाने होते. त्याचबरोबर दूध पाजण्याच्या खर्चातही बचत होते. कोठीपोटाची लवकर वाढ होऊन चारा पचवण्याची क्षमता लवकर तयार होते. • वासरांना जन्मल्यानंतर आठव्या दिवशी जंताचे औषध द्यावे. त्याचबरोबर तेथून पुढे शेणाची तपासणी करून गरजेनुसार जंताचे योग्य औषध, योग्य मात्रेत द्यावे. • वासरांना जंत प्रादुर्भाव व बाह्यपरोपजीवीच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गोठा कोरडा ठेवावा. गोठा हवेशीर, स्वच्छ ठेवावा. गोठ्याभोवती दलदल असू नये. • वासरांना वयानुसार वेगळे करून वेगवेगळ्या कप्प्यात ठेवल्यास वासरांना गरजेनुसार चारा, पाणी मिळते. त्यामुळे त्यांची शारीरिक वाढ चांगली होते. याबरोबरच वासरांना गोठ्यात वयानुसार गरजेएवढी जागा द्यावी. चारा-पाण्याची व्यवस्था करावी. • वासरांना एका ठिकाणी बांधून न ठेवता नेहमी खुले ठेवावे. • वासरांच्या आहारात वयोमानानुसार द्विदल, एकदल चारा, वाळलेला चारा, पशुखाद्य यांचा पशुवैद्यकांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात वापर करावा. एकाच प्रकारच्या चाऱ्याचा नियमित वापर टाळावा. • वासरांच्या आहारातही दररोज २० ते ३० ग्रॅम क्षारमिश्रणाचा वापर करावा. (आहारामध्ये कोणत्या प्रकारचा चारा आहे त्यानुसार क्षार मिश्रणाचा वापर करावा). • वासरांना केवळ नैसर्गिक गवत, कडबा, सोयाबीन भुसकट खाण्यास देऊ नये. • वासरांतील कातडीचे, पोटाचे व आतड्याच्या आजारावर तत्काळ उपचार करावेत. • वासरांच्या आहारात बायपास प्रथिनांचा वापर करावा, वासरांच्या आहारात प्रोबायोटिक्स इ. वापर करावा. • वासरांचे ठरावीक कालावधीने वजन करावे. यामुळे वासरांची वाढ होते का? किती प्रमाणात होते? हे समजते त्यानुसार वासरांच्या आहारात योग्य ते बदल करणे शक्य होते. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
1