कृषी वार्ताअ‍ॅग्रोवन
वारस नोंदीचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणार!
👉सातारा :जिल्ह्यात रखडलेले वारसनोंदीचे काम कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम ठरवून पूर्ण करु. साधारण, येत्या ३१ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे जिल्हा तलाठी संघाकडून सांगण्यात आले आहे. 👉जिल्हा तलाठी संघाची बैठक संघाचे अध्यक्ष राजकुमार पांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी येथे झाली. 👉या बैठकीमध्ये ३१ मार्च २०२१ पर्यंत न्यायालयीन प्रकरणे वगळून सर्व मयत खातेदारांच्या वारस नोंदी पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. संघाचे तालुकाध्यक्ष, तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते. 👉एक मार्च ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत संबंधित गावच्या तलाठी कार्यालयात गाव नमुना नं ८ ‘अ’ चे वाचन करून मयत खातेदारांचा शोध घेऊन नोंदी केल्या जाणार आहेत. 👉नागरिकांनी १ ते ५ मार्च २०२१ या कालावधीत तलाठी कार्यालयात मयत खातेदारांचा मृत्यू दाखला, वारसाबाबतचे प्रतिज्ञापत्र / कोर्टाचे वारस प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तलाठी संघाने केले. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
36
10
इतर लेख