कृषि वार्ताTV9 Marathi
वारसदाराच्या नोंदणीबाबत SBI चा ग्राहकांना मोठा दिलासा!
➡️ देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या ग्राहकांची सर्वात मोठी समस्या सोडवली आहे. आता एसबीआयचे ग्राहक घरी बसून बँक खात्यामध्ये वारसदार व्यक्तीच्या नावाची नोंदणी करू शकतील. YONO LITE (योनो लाईट)अ‍ॅप वरुन कशी नोंदणी करावी? ➡️ जर तुम्ही स्टेट बँकेचे YONO LITE अ‍ॅप वापरत असल्यास त्यावर प्रथम लॉग इन करावे लागेल. अ‍ॅप ओपन केल्यानंतर मुख्यपृष्ठ बटणावर क्लिक करा आणि सेवा विनंती पर्याय निवडा. सेवा विनंतीवर क्लिक केल्यावर, जे पेज उघडेल तिथे ऑनलाइन नामनिर्देशन म्हणजेच वारसदाराची माहिती भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर क्लिक केल्यावर, तुम्हाला खात्याचा तपशील निवडावा लागेल आणि नॉमिनीची म्हणजेच वारसदाराची संपूर्ण माहिती भरावी लागेल. बँक ग्राहकाला इथं त्यानं वारसदार म्हणून माहिती भरलेल्या व्यक्ती सोबतचं नातं लिहावं लागते. जर आधी एखाद्या व्यक्तीची वारसदार म्हणून नोंद असेल तर ती रद्द करावी लागते. त्यांतर नव्या व्यक्तीची माहिती भरता येते. ➡️ नेट बँकिंगद्वारे कशी माहिती अपडेट करायची? तुम्ही एसबीआय नेट बँकिंग वापरत असाल तर तुम्ही एसबीआय वेबसाइट onlinesbi.com ला भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला रिक्वेस्ट अँड इनक्वायरी या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्यासमोर बरेच पर्याय उघडतील. ज्यामधून ऑनलाइन नामनिर्देशनाचा पर्याय निवडावा लागेल. जर तुमची स्टेट बँकेत अधिक खाती असतील तर तुम्ही योग्य ते खाते निवडून त्यामध्ये वारसदाराची माहिती अपडेट करु शकता. माहिती भरल्यानंतर त्याची पडताळणी करुन ते अपडेट केले जाते. वारसदाराची माहिती भरणं का गरजेचे? ➡️ खातेधारकानं बँक खातं उघडताना नामनिर्देशन म्हणजेच वारसदाराची माहिती भरणे फार आवश्यक असते. जर खातेदाराचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला तर त्या खात्यात असलेल्या रकमेवर नामनिर्देशन केलेल्या व्यक्तीचा पूर्ण हक्क असतो. जर खातेधारकानं वारसदाराची माहिती भरली नाही तर त्याच्या खात्यावरील रक्कम बँकेकडे राहते. एका अंदाजानुसार मृत्यू झालेल्या अशा खातेदारांच्या नावे कोट्यवधी रुपये बँकांमध्ये जमा आहेत. परंतु त्यांच्या खात्यात नामनिर्देशित नसल्यामुळे बँक ग्राहकांच्या कुटूंबाला ही रक्कम मिळत नाही. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
9
संबंधित लेख