AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वानू / पैसा कीड नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वानू / पैसा कीड नियंत्रण !
🌱वाणी या किडीलाच पैसा, तेलंगी अळी अशा विविध नावांनी ओळखलं जात. कापूस तसेच सोयाबीन पिकाची पेरणी झाली असेल. या पिकांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कीड दंडगोलाकार व लांबोळकी असून तिला 36 ते 400 पाय असतात. तिचा रंग काळपट लालसर असून तोंडावर दोन स्पर्शिका असतात. या किडीची मादी एका वेळेस 10 ते 300 अंडी ओलसर जागेवर घालते. वाणी कीड बहुभक्षी तसेच समूहाने आढळणारी कीड आहे. पेरणीनंतर तुरळक जसे 200 ते 250 मिमी पेक्षा कमी पाऊस, रोपावस्थेत पावसाची दीर्घ काळ उघडीप व जमिनीला भेगा पडल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो. वाणी कीड रोपट्यांच्या बुंध्याशी डोके खुपसून आत शिल्लक असलेला दाना खातात. कालांतराने अशी रोपे सुकतात. हे नुकसान टाळण्यासाठी आपण खालील प्रमाणे उपाययोजना करू शकतो.  वाणीचे समूह गोळा करून केरोसीन च्या पाण्यात बुडवून नष्ट करावेत.  आमिष सापळ्यांचा वापर करू शकतो त्यामध्ये गहू पीठ दिड कप + मध दोन चमचे + कार्बोसल्फान 50 मिली + पाणी अर्धा कप प्रमाणात मिश्रण करावे. मिश्रणाच्या गोळ्या करून पोत्याच्या तुकड्यामध्ये बांधून जमिनीत 15 ते 20 ठिकाणी 4 ते 6 इंच खोल गाडाव्यात.  फेनवलरेट किंवा क्लोरोपायरीफॉस डस्ट ची 10 किलो प्रति एकर याप्रमाणे धुरळणी करावी.  फेनवलरेट 20 % प्रवाही 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 % प्रवाही 30 मिली प्रति पंप याप्रमाणे प्रादुर्भावग्रस्त भागात आळवणी अथवा फवारणी करावी.  Thiodicarb 75% WP घटक असणारे लार्वीन कीटकनाशक 250 ग्रॅम प्रति एकर अधिक 2 ते 3 किलो धान्याचा कोंडा/ लाकडाचा भुसा/कोरडे शेणखत/लाह्या/ मुरमुरे यामध्ये मिसळून प्रादुर्भावग्रस्त प्लॉट मध्ये पसरून द्याव्यात. 🌱वरील पैकी कोणतीही एक उपाययोजना करून वाणी किडीपासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी मदत होईल 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
65
27
इतर लेख