AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
  वादळी वाऱ्यासह होणार जोरदार पाऊस!
हवामान अपडेटAgrostar
वादळी वाऱ्यासह होणार जोरदार पाऊस!
👉🏻हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 7 ते 11 मे दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात सध्या कुठे ऊन, तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. 👉🏻 राज्यात तापमानाचा पारा गेल्या काही दिवस वाढताच आहे. त्यानंतर 7 मे ते 11 मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. 7 ते 11 मे दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह, विजेच्या गडगडाटासह गार अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार, तर काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे. 👉🏻पूर्व विदर्भात 7 ते 11 मे दरम्यान, विजांचा गडगडाटासह वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे. 7 मेच्या आधी हळद, कांदा काढून झाकून ठेवा, कारण त्यानंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही 7 मेपासून पुढील पाच दिवस जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. 👉🏻पश्चिम महाराष्ट्रातही हे पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, हा पाऊस ऊसाच्या पिकासाठी फायदेशीर असणार आहे. यासोबतच कोकणातही 7 मेपासून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रा,मुंबई,नाशिक तसेच महाराष्ट्राच्या विविध भागात 8 ते 11 मे दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
52
2