सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वाटाणा पिकामध्ये एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन
वाटाणा पिकामधील प्रमुख किडी: मावा:- या किडीची पिले आणि प्रौढ दोघे ही पिकांच्या कोवळ्या भागातून रसशोषण करून नुकसान करतात. या किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर काळे डाग तयार होतात. ज्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होतो.
नियंत्रण:- _x000D_ १) पिकाच्या ज्या भागावर (फांदी, पाने) मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येईल तो भाग काढून टाकावा._x000D_ २) निंबोळीचे तेल १५०० पीपीएम १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी._x000D_ ३) अधिक प्रादुर्भाव असल्यास नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम २५% डब्ल्यूजी @१० ग्रॅम प्रति पंप (१५ लिटर) प्रमाणाने फवारणी करावी._x000D_ नागअळी:- ही अळी चा पीक वाढीच्या अवस्थेत प्रादुर्भाव आढळतो. ही अळी पानाच्या आतील हरितद्रव्ये खाऊन पानांवर नागमोडी पट्टे तयार करते. _x000D_ नियंत्रण:- _x000D_ १) या किडीच्या नियंत्रणासाठी कडुलिंबाची पावडर (प्रति लिटर पाण्यात ४० ग्रॅम निंबोळी पावडर) ची फवारणी केल्यास फायद्याचे ठरेल._x000D_ २) प्रादुर्भाव अधिक असल्यास इमिडाक्लोप्रिड १७.८% एसएल @४० मिली किंवा थायोमेथॉक्झाम २५% डब्ल्यूजी @४० ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यातून फवारणी करावी._x000D_ वाटाणा पिकातील प्रमुख रोग:_x000D_ भुरी रोग:- खोड, पाने आणि शेंगावर या रोगाचा प्रादुर्भाव होऊन या भागांवर सौम्य डाग तयार होतात, हे लहान ठिपके कालांतराने एकमेकांना जोडले जाऊन पाने पूर्ण पांढरी पडून गळून जातात._x000D_ नियंत्रण:-_x000D_ १) रोग प्रतिकारक असणाऱ्या वाणांची निवड करावी._x000D_ २) प्रादुर्भाव आढळून येताच नियंत्रणासाठी सल्फर ८०% डब्ल्यूजी @५०० ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी._x000D_ मर रोग:- हा एक बुरशीजन्य रोग आहे. प्रादुर्भाव झालेल्या रोपांची पाने पिवळी पडून रोपे सुकतात._x000D_ नियंत्रण:- _x000D_ १) या रोगाच्या नियंत्रणासाठी बियाणे लागवडीपूर्वी थायरम @२ ग्रॅम + कार्बेन्डाझिम @१ ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा @४ ग्रॅम + विटावॅक्स @२ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी._x000D_ २) रोग प्रतिकारक बियाणांची निवड करावी._x000D_ ३) उभ्या पिकातील बुरशीचे नियंत्रण करण्यासाठी कार्बेन्डाझिम ५०% डब्ल्यूपी @२०० ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून रोपांच्या खोडावर/ बुंध्याजवळ फवारणी करावी._x000D_ संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सीलेंस_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर, फोटोखाली दिलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा!_x000D_
192
0
संबंधित लेख