AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वाटाणा पिकातील मर रोगाची लक्षणे आणि उपाय
गुरु ज्ञानAgroStar
वाटाणा पिकातील मर रोगाची लक्षणे आणि उपाय
👉फ्युसारिअम नावाच्या जमिनीतील बुरशीमुळे मर रोगाची समस्या अनेक पिकांमध्ये उद्भवते. हा रोग विशेषतः फुलोरा लागण्याच्या काळात जास्त प्रमाणात दिसतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांचा रंग पिवळसर पडतो आणि ती खाली झुकल्यासारखी दिसतात. झाडे मलूल होतात आणि त्याच्या मुख्य मुळांवर लालसर तपकिरी डाग दिसून इतर मुळे सडू लागतात. 👉मर रोगाचा प्रादुर्भाव जमिनीतील बुरशी आणि बियाण्याद्वारे होतो, ज्यामुळे तो जलद पसरतो. त्यामुळे योग्य नियंत्रण न घेतल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते. 👉उपाययोजना: 1. बीजप्रक्रिया: लागवडीपूर्वी बियाण्यांना योग्य बुरशीनाशकांची प्रक्रिया करावी. 2. बुरशीनाशकांचा वापर: सुरुवातीपासूनच जमिनीत मँडोझ, मेटॅलग्रो, किंवा कूपर यांसारख्या प्रभावी बुरशीनाशकांचा वापर करावा. 3. जमिनीची निगा: जमिनीची योग्य मशागत व निचरा होईल याची काळजी घ्यावी. 👉याशिवाय, रोगट झाडे काढून टाकावीत व पिकाचे नियोजन सुधारित पद्धतीने करावे. योग्य नियंत्रण उपायांमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो आणि उत्पादन वाढवता येते. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0