AgroStar
वांगी पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन!
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन!
• वांगी पिकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्याने पीक निरोगी आणि स्वच्छ राहते. _x000D_ • आपण मागील वर्षी वांगी पिकाची ज्या क्षेत्रात लागवड केली आहे त्याक्षेत्रामध्ये सध्या वांगी लावू नका. म्हणजेच पिकाची फेरपालट करणे आवश्यक._x000D_ • वांगी पिकामध्ये, प्रत्येक दोन ओळींनंतर कोथिंबिरीची एक ओळ लावावी. लागवडीनंतर २ आठवड्यांनी प्रति एकर फेरोमोन सापळे लावावे, आवश्यक असल्यास १० ते १२ फेरोमोन सापळे प्रति एकर १० ते १२ मीटरच्या अंतरावर लावावे. तसेच रोगग्रस्त फांद्या कापून जमिनीत काढावेत._x000D_ • पीक लागवडीनंतर २१ दिवसांनी ४ ते ५ प्रति एकर ट्रायकोकार्ड लावावे._x000D_ • २५० ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरीडी तीन किलो कुजलेल्या शेणामध्ये मिसळा व सात दिवसांनी पिकाच्या वाढीसाठी द्यावे._x000D_ • लोकप्रिय संकरीत वाणांची जुलैच्या पहिल्या आठवड्यात बेडवर बियाणांची लागवड करावी._x000D_ • पेरणीपूर्वी, बियाण्यावर ट्रायकोडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम/किलो याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी._x000D_ • वेळोवेळी खुरपणी करावी आणि संक्रमित झाडे रोपवाटिकेतून बाहेर काढावीत._x000D_
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
58
5
इतर लेख