AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वन्यप्राणी नुकसानीत मिळवा भरपाई!
योजना व अनुदानAgrostar
वन्यप्राणी नुकसानीत मिळवा भरपाई!
➡️वन्यप्राण्यांनी पिकाचे नुकसान केल्यास  -  पीक नुकसानीची तक्रार अधिकार क्षेत्र असलेल नजीकचे वनरक्षक, वनपाल अथवा वन परिक्षेत्र अधिकारी यांचेपैकी कोणाकडेही घटना घडल्यापासून तीन दिवसांत करावी.  त्याची शहानिशा संबंधीत वनरक्षक, कृषी सहाय्यक आणि तलाठी अशा तीन सदस्यांच्या समितीमार्फत १० दिवसांचे आत करण्यात येते. ➡️शेतकऱ्यांनीही नुकसानीची मोबाईलवर छायाचित्रे काढून पुरावे गोळा करून ठेवल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. प्रत्येक प्रकरणी नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधित सहाय्यक वनसंरक्षक यांनी घटना घडल्याचे तारखेपासून तीस दिवसांत काढणे आवश्यक आहे. व आदेश काढल्यानंतर एक महिन्याचे आत बाधित व्यक्तीला नुकसान भरपाई देण्यात आली पाहिजे. ➡️ज्या व्यक्तींना पीक संरक्षणार्थ बंदूक परवाने देण्यात आले आहेत, अशा व्यक्तीच्या शेतीची नुकसान भरपाई विहित दराने वन्यहत्ती किंवा रानगवा किंवा इतर वन्यप्राणी यांना इजा किंवा त्यांची शिकार झाली नसल्याची खात्री झाल्यानंतरच देण्यात येते. ➡️नुकसान भरपाईसाठी अपात्र ठरविण्यात येणारी प्रकरणे.   -  वनजमिनीवर अतिक्रमणाद्वारे करण्यात येणारी शेती. -   भारतीय वन किंवा वन्यजीव अधिनियमांतर्गत ज्यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविला गेला आहे अशा व्यक्तींची शेती.  -  ज्या कुटुंबात ४ पेक्षा जास्त गुरे मुक्त चराईसाठी जंगलात जातात त्या कुटुंबाची शेती. -   मागील एक महिन्याच्या कालावधीत वन्यप्राण्यांच्या शिकारीची घटना झालेली गावे. ➡️थोडक्यात काय तर नुकसान भरपाई हवी असेल तर गावकऱ्यांनी वन आणि वन्यजीव कायद्याचे पालन तर करायलाच हवे, पण वन विभागाच्या वन्यजीव संवर्धनाच्या कामात सक्रिय सहभागही घ्यायला हवा. सेवा हमी कायद्यानुसार नुकसान भरपाईची रक्कम ३० ते ६० दिवसांत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
4
इतर लेख