AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लॉकडाउन परिस्थितीमध्ये राहणार जीवनावश्यक सेवा चालू
समाचारइंटरनेट
लॉकडाउन परिस्थितीमध्ये राहणार जीवनावश्यक सेवा चालू
केंद्र व राज्य शासन कोरोनापासून बचाव करण्यासाठी सातत्याने जनजागृती मोहीम राबवित आहेत. यामुळे, केंद्र सरकारने 21 दिवसांसाठी म्हणजे 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका किंवा कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका. लॉकडाऊन दरम्यान आपल्यासाठी कोणत्या सेवा सुरू राहतील हे आम्ही सांगणार आहोत. या अत्यावश्यक सेवा लॉकडाऊनमध्ये सुरूच राहतील 1. भाजी, किराणा, फळ, औषध व दुधाची दुकाने 2. पोस्ट कार्यालये, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, आपत्ती व्यवस्थापन या संस्था 3. बँकां, एटीएम 4. दवाखाने, हॉस्पिटल 5. पेट्रोल पंपांसह एलपीजी पंप व गॅस एजन्सी 6. रुग्णवाहिका सेवा 7. इंटरनेट, प्रसारण आणि केबल सेवा लॉकडाऊन दरम्यान या संस्था आणि सेवा बंद राहतील 1. सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, बस, हवाई प्रवास 2. सर्व शैक्षणिक संस्था व धार्मिक स्थळे 3. प्रशिक्षण, संशोधन व कोचिंग संस्था 4. हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरंट्स, जिम, स्पा, क्लब 5. सर्व खाजगी कार्यालये, कर्मचारी घरात बसून काम करेल. 6. सर्व कारखाने, कार्यशाळा, गोदामे, बाजारपेठा 7. अंत्यसंस्कारात 20 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. संदर्भ : इंटरनेट कोरोनाच्या बचावासाठी ही महत्वपूर्ण माहिती लाइक करा व शेअर करा
189
0
इतर लेख