AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लेखी परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी !
नोकरी आणि शिक्षणAgrostar
लेखी परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी !
➡️कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळण्याचा एक सोपा मार्ग आहे. रेल्वेत स्पोर्टस् कोट्यातून ही संधी मिळेल.भारतीय रेल्वेने 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी कोणत्याही परीक्षेविना थेट भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया स्पोर्टस् कोट्यातून करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 5 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाली आहे. तेव्हा वाट कसली पाहता, लगेचच अर्ज करा.. ➡️इथं करा अर्ज : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तीन आठवड्यांहून अधिक दिवस मिळणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. https://www.rrc-wr.com/ या लिंक, संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करु शकता. ➡️शैक्षणिक पात्रता : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक अट जाहीर करण्यात आली आहे. पदवीच्या दुसऱ्या अथवा अंतिम वर्षाला असणारा, इयत्ता 12वीं उत्तीर्ण उमेदवाराला अर्ज करता येईल. या पदासाठीची निवड ही खेळातील तुमच्या प्राविण्यावर अवलंबून राहिल. तसेच तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेचाही विचार होईल. ➡️ वयोमर्यादा : या पदासाठी अर्जदार उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असायला हवे. ➡️अर्जासाठी शुल्क : खुला आणि ओबीसी प्रवर्ग- 500 रुपये एससी,एसटी, महिला, आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग – 250 रुपये ➡️ वेतन किती असेल : या पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवाराला दर महिन्याला 25500-81100 / 29200- 92300 रुपये वेतन मिळेल. ➡️ या पदासाठी भरती : रेसलिंग (पुरुष) फ्रीस्टाइल – 1, शूटिंग (M/W) एअर पिस्टल / स्पोर्ट्स पिस्टल/ राइफल शूटिंग 3 पद /राइफल शूटिंग प्रोन -1 , कबड्डी – ऑलराउंडर – 01, हॉकी – 02, स्तर-2 आणि स्तर-3 – 16, वेटलिफ्टिंग 02, पावरलिफ्टिंग -1, पावर लिफ्टिंग- 1, रेसलिंग – 01, शूटिंग – 01, कबड्डी- पुरुष – 01, कबड्डी – महिला – 2 हॉकी पुरुष – 01 जिमनॅस्टिक पुरुष – 02 क्रिकेट पुरुष – 02 क्रिकेट महिला – 1. ➡️संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
10
इतर लेख