AgroStar
लिंबू वर्गीय पिकातील डिंक्या रोगाचे नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लिंबू वर्गीय पिकातील डिंक्या रोगाचे नियंत्रण !
🌱डिंक्या हा बुरशीजन्य रोग असून याचा प्रादुर्भाव संत्री, मोसंबी, लिंबू या पिकांमध्ये होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाड्याच्या सालीतून डिंकासारखा पदार्थ ओघळताना दिसतो. झाडाच्या सालीचा रंग लालसर होऊन शेवटी काळपट होतो. रोगट लाल साल वाळून तिला उभ्या भेगा पडतात. प्रतिबंधात्मक नियंत्रण म्हणून झाडाच्या खोडाला पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर जमिनीपासून 1 मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी आणि बागेत पावसाळ्यात जास्तीचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. प्रादुर्भाव झाल्यानंतर रोगग्रस्त झाडाची साल निर्जंतुक केलेल्या धारदार चाकूने काढून जखमेवर Metalaxyl 8% + Mancozeb 64% WP घटक असणारे मेटल ग्रो 30 ग्रॅम 1 लिटर पाण्यात मिसळून ते द्रावण लावावे. 🌱संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
4
इतर लेख