किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लिंबू पिकातील नागअळीचे जीवनचक्र
 लक्षणे:- अंड्यातून बाहेर पडणारी बाल्यावस्थेतील अळी पिकावर सर्वाधिक परिणाम करते. पानांमध्ये प्रवेश करून आतील हरितद्रव्ये खाते. या अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर पांढरट पारदर्शक नागमोडी वलय दिसून येतात. अशी प्रादुर्भावग्रस्त पाने कालांतराने सुकून गळून जातात. _x000D_ _x000D_ • जीवनचक्र:- _x000D_ अंडी अवस्था:- मादी कीड १३ दिवसांच्या आत पानांच्या उतींमध्ये १६० पर्यंत अंडे देते. ही अंडी २ ते ३ दिवसांच्या उबतात._x000D_ • अळी अवस्था:- नागअळी आतील हरितद्रव्ये खात असल्याने, पानांवर पांढरे नागमोडी आकाराचे पारदर्शक पट्टे दिसतात._x000D_ • कोषावस्था:- नागअळी २ ते २० दिवसांच्या आत मातीमध्ये कोषावस्थेत परिवर्तित होते. _x000D_ • प्रौढ/पतंग: - नागअळीची पतंग अवस्था ६ ते २२ दिवसांनंतर कोषावस्थेतून बाहेर येते. पतंग पिवळ्या रंगाचे असून त्यावर काळ्या रंगाचे पट्टे असतात. याच्या वर्षात अनेक पिढी होतात. _x000D_ • नियंत्रण:- बुप्रोफेंझिन ७०% डीएफ किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८०% एसएल @ २० मिली प्रति लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी._x000D_ संदर्भ – अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस_x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा._x000D_ _x000D_
69
4
इतर लेख