AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लिंबूवर्गीय फळझाडातील डिंक्या रोग व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लिंबूवर्गीय फळझाडातील डिंक्या रोग व्यवस्थापन!
डिंक्या हा रोग मोसंबी, संत्रा व कागदी लिंबावर येणारा प्रमुख बुरशीजन्य रोग आहे. लिंबुवर्गीय बागेचा ह्रास होण्यामध्ये या रोगाचा मोठा वाटा आहे. या रोगाची लागण झाल्यामुळे झाडांची उत्पादकता कमी होते. रोगाची कारणे : हा रोग फायटोफ्थोरा पालमिव्होरा, फायटोफ्थोरा सिट्रीफ्थोरा व फायटोफ्थोरा निकोशियाना या प्रमुख बुरशीमुळे होतो. लक्षणे : या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या बुंध्याची साल फाटून त्यातून डिंक स्त्रवतो, त्यामुळे त्याला ’डिंक्या’ हे नाव आहे. रोगाची तीव्रता वाढल्यावर जमिनीलगत खोडे कुजतात व रोपे कोलमडून मरतात. बागेमधील झाडांची तंतुमय मुळे, जमिनीलगतचे खोड व सोटमुळे खोड, फांद्या, झाडाच्या जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळे यांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फळे सोडून झाडांच्या कोणत्याही भागावर प्रादुर्भाव झाला तरी त्याची लक्षणे पानाच्या शिरा पिवळसर होऊन दृश्य होते. पुढे पिवळेपणा वाढून पानगळ होते व फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात व शेवटी रोगाच्या तीव्रतेनुसार झाडाचा ह्रास होतो. तंतुमय मुळास प्रादुर्भाव झाल्यामुळे, ती कुजतात व त्यांची साल सहज अलग होते. जमिनीलगत खोड व मुळांना लागण झाली, तर त्यांची साल सडू लागते. खोडावर व फांद्यावर लागण झाल्यास त्या ठिकाणापासून डिंकाचा स्त्राव सुरू होतो. पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना या बुरशीची लागण झाली तर पाने करपतात व फळे सडून गळतात. प्रसार : या बुरशीचा प्रादुर्भाव जमिनीद्वारे होतो. रोपवाटिकेतील रोगग्रस्त रोपाद्वारे हा रोग बागेत येतो. बागेत रोगग्रस्त झाडाबरोबर आलेली बुरशी वाढून, निरोगी झाडांना प्रादुर्भावित करते. हा प्रसार पावसाचे व भिजवणीच्या प्रवाहित पाण्याद्वारे होतो, डिंक्या रोगच्या बंदोबस्ताकरिता खालील उपाययोजना अमलात आणावी. • कलमाचा खुंट शक्य तो रंगपूर लिंबू जातीचा असावा. • डोळा साधारणत : 30 से.मी. उंचीवर बांधलेला असावा. • ओलीत करताना दुहेरी आळे पद्धतीचा वापर करावा. • पाण्याचा उत्तम निचरा ठेवावा. • ज्या ठिकाणाहून डिंक ओघळतो तेथील साल झाडाच्या आतील भागास इजा होणार नाही अशा प्रकारे तीक्ष्ण चाकूने खरवडून काढावी. नंतर 1% पोटॅशियम परमँगनेट या द्रावणाने धुवून काढावी. • नंतर जखमेवर 50 ग्रॅम मॅटको (मेटॅलॅक्सिल ८% + मॅंकोझेब ६४ %) किंवा फॉसीटिल एएल 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे मिसळून पेस्ट लावावी. • जास्त कालावधी साठी परिणाम रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर बोर्डोमलम जमिनीपासून 1 मीटर उंचीपर्यंत लावावे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
108
61