AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लिंबूवर्गीय पिकातील डिंक्या रोगाचे व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
लिंबूवर्गीय पिकातील डिंक्या रोगाचे व्यवस्थापन!
डिंक्या : या रोगाचा प्रादुर्भाव कलम केलेल्या भागाच्या आसपास होतो. रोगग्रस्त सालीतून डिंक ओघळताना दिसतो. नियंत्रणासाठी- ➡️ आळ्यातून पाणी देण्याची पद्धत बंद करावी. त्याऐवजी झाडाच्या बुंध्याभोवती दोन वर्तुळाकार आळे तयार करून, बुंध्याला पाणी द्यावे. ➡️ बागेतील अतिरीक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी (विशेषतः पावसाळ्यात) संत्रा झाडाच्या दोन ओळींत चर खोदावेत. ➡️ ओलिताकरिता ठिबक सिंचन वापरावे. ➡️ उंच डोळा बांधणीच्या कलमांचा वापर करावा. ➡️ रोगग्रस्त झाडाची साल धारदार व निर्जंतुक केलेल्या पटाशी किवा चाकूने काढून टाकावी. रोगग्रस्त भाग १ टक्के पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) निर्जंतुक करावा. त्यावर बोर्डो मलम (१ः१ः१०) लावावा. ➡️ झाडावर तसेच रोगग्रस्त भागावर फवारणी प्रतिलिटर पाणी मेटॅलक्झिल (एम) अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम किंवा फोसेटील ए.एल. २ ग्रॅम. डिंक्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी, संत्रा झाडाच्या बुंध्यावर बोर्डो मलम (१ः१ः१०) पावसाळ्यापूर्वी (मे) व पावसाळ्यानंतर मध्ये लावावे. ➡️ रोग दिसताच क्षणी ट्रायकोडर्मा हार्जियानम अधिक ट्रायकोडर्मा व्हीरिडी अधिक सुडोमोनास फ्ल्यूरोसन्स प्रत्येकी १०० ग्रॅम अधिक १ किलो शेणखत मिसळून झाडाच्या परिघात जमिनीतून द्यावे. संपूर्ण झाडावर फोसेटील ए.एल. @२ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी 🛒क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
19
7