AgroStar
७ लाख शेतकऱ्यांना दिलासा! किसान क्रेडिट कार्डची मर्यादा दुप्पट आणि व्याज १ टक्का करण्याची मागणी.
कृषी वार्ताकृषी जागरण
७ लाख शेतकऱ्यांना दिलासा! किसान क्रेडिट कार्डची मर्यादा दुप्पट आणि व्याज १ टक्का करण्याची मागणी.
लॉकडाऊनमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेचे संकट पाहता किसान शक्ती संघाचे अध्यक्ष पुष्पेंद्र सिंह यांनी (कचक) किसान क्रेडिट कार्डची मर्यादा दुप्पट करून व्याज कमी करण्याची मागणी केली आहे.आता त्याची मर्यादा ३ लाख रुपये आहे .आणि वेळेवर पैसे परत केल्यास ४ टक्के व्याज दिले जाते. त्याची मर्यादा ६ लाख रुपये असावी आणि व्याज दर फक्त १ टक्के असावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे .देशातील सुमारे ७ कोटी शेतकऱ्यांकडे के.सी.सी. पास आहेत. _x000D_ शेतीच्या बाबीमध्ये जाणकार असलेल्या सिंह यांनी शेतकऱ्यांची सर्व कर्ज व हप्ते एक वर्षासाठी स्थगित करण्याची मागणी केली आहे. केसीसीवर बँकाकडून घेतल्या गेलेल्या सर्व अल्प -मुदतीच्या कृषी कर्जाची भरपाई करण्याची तारीख सरकाने दोन महिन्यापर्यन्त वाढवली आहे. ते ३१ मार्च ते ३१ मे पर्यंत हि मुदत वाढिवण्यात आली आहे. याचाच अर्थ आता व्याजात कोणतीही वाढ न करता शेतकरी दरवर्षी केवळ ४ टक्के जुन्या दराने ३१ मे पर्यंत कर्ज परतफेड करू शकतात. वर्षभर हे निलंबित करण्याची मागणी किसान शक्ति संघाकडून केली जात आहे _x000D_ शेतीकरिता स्वस्त कर्ज _x000D_ केसीसीवर घेतलेल्या ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी केंद्र सरकार आधीच शेतकऱ्यांना मोठी सूट देत आहे. व्याजदर ९ टक्के आहे पण त्यात सरकार २ टक्के अनुदान देते .अशा प्रकारे तो ७ टक्क्यापर्यंत खाली येतो.पण वेळेवर परत केल्यानंतर तुम्हाला ७ टक्के अधिक सूट मिळेल .अशा प्रकारे त्याचा दर प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी फक्त ४ टक्के आहे .आता ते १ टक्के करण्याची मागणी केली जात आहे .या योजनेचा फायदा म्हणजे सावकारांवर शेतकऱयांचे अवलंबन कमी होती. त्यांना शेतीसाठी स्वस्त कर्ज मिळते._x000D_ म्हणूनच केएमसी योजना पंतप्रधान किसान योजनेशी जोडली गेली _x000D_ किसान क्रेडिट कार्ड योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शी जोडली गेली आहे. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत ज्याला वार्षिक ६००० रुपये प्राप्त झाले आहेत.तो महसूल,आधार व बँक खात्याचा तपशील सरकारकडे आहे .या प्रकरणात, दोन्ही योजना एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत._x000D_ केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांचे म्हणणे आहे, कि किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांनी त्यांच्या खात्याशी संबंधित बँकेत की=जाऊन केसीसीकडे अर्ज सादर करावा, बँकेच्या मुख्य व्यस्थापकीय संचालकांना वित्त विभागाकडून या संदर्भात आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.अर्जानंतर १४ दिवसांच्या आत त्याचा लाभ मिळेल._x000D_ संदर्भ - २९ एप्रिल २०२० कृषी जागरण, _x000D_ यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा._x000D_
618
0
इतर लेख