AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले २ हजार रुपये!
कृषी वार्ताTV9 Marathi
६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले २ हजार रुपये!
👉पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत ६०.५० लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सातव्या हप्त्यातील दोन हजार जमा करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर २०२० ला सातवा हप्ता जारी केला होता. तेव्हापासून आतापर्यंत ६० लाख ५० हजार २८० शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मार्च महिन्यापर्यंत आणखी ५० लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार जमा केले जाणार आहेत. 👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर २०२० ला ९ कोटी शेतकऱ्यांच्या कात्यावर १८ हजार कोटी ट्रान्सफर केले होते. त्यानंतर ५८ दिवसांमध्ये कृषी विभागानं ६० लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २ रुपये पाठवले आहेत. दरदिवशी १ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. त्यांनी पीएम- किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन त्यांचं रेकॉर्ड चेक करणं गरजेचे आहे. लाभार्थ्यांची संख्या ११ कोटींवर 👉पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या २१ फेब्रुवारीपर्यंत ११.६४ कोटींवर पोहोचली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ज्यांची कागदपत्रे व्यवस्थित आहेत. त्या शेतकऱ्यांची ही संख्या आहे. या योजनेद्वारे सरकारचा शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न आहे. राज्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन 👉सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. त्यांअतर्गत डबलिंग फार्मर्स इनकम कमिटीचे सदस्य विजयपाल तोमर यांनी राज्य सरकारांनी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केलीय. मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचा दाखला त्यांनी दिला. मध्यप्रदेशमध्ये त्या योजनेअतंर्गत ४ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाते. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना त्याचे रेकॉर्ड तपासून चुकले असल्यास दुरस्त करावे लागणार आहे. आपल्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासणार? 👉पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे आले का हे तुम्ही सहजपणे तपासू शकता. तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 👉सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. 👉तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल. 👉होमपेजवर किसान कॉर्नवर जा. 👉तिथे स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा 👉त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका. 👉त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल. संदर्भ - TV9 Marathi, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
83
12
इतर लेख