AgroStar
लाखो रुपये मिळवून देणारी पोस्टाची जबरदस्त योजना!
कृषि वार्ताtv9marathi
लाखो रुपये मिळवून देणारी पोस्टाची जबरदस्त योजना!
मित्रांनो, आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा योजनेबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या अंतर्गत 7.1 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. जर आपण या योजनेत दररोज 100 रुपये गुंतवणूक केली, तर 15 वर्षांनंतर तुम्हाला 100000 रुपये मिळतील, जे तुमच्या भविष्यात उपयुक्त ठरू शकतील. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यावर 7.10 टक्के व्याजदर- ➡️ पोस्ट ऑफिस सध्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यावर 7.10 टक्के व्याजदर देत आहे. या अंतर्गत आर्थिक वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. या योजनेंतर्गत एखादी व्यक्ती केवळ एक खाते उघडू शकते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही योजना कर अनुकूल आहे. आपण यात गुंतवणूक केल्यास कलम 80 सी अंतर्गत तुम्हाला वजावटीचा लाभ मिळेल. परिपक्वतावरील व्याज उत्पन्न देखील पूर्णपणे करमुक्त असेल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा अधिक आकर्षक पर्याय मिळेल. त्याचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे आहे आणि त्यानंतर ती 5 वर्षांच्या कालावधीत तो वाढविला जाऊ शकतो. मॅच्युरिटीपूर्व पैसे काढण्याच्या संदर्भात काही अटी आणि शर्थी आहेत. व्याजदर तीन महिन्यांनी अद्ययावत होतात- ➡️ अर्थ मंत्रालयाकडून दर तीन महिन्यांनी व्याजदरामध्ये सुधारणा केली जाते. जून तिमाहीचा व्याजदर 7.1 टक्के आहे. 30 जून रोजी अर्थ मंत्रालय व्याजदराबाबत निर्णय घेईल. व्याज उत्पन्न प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्या खात्यावर हस्तांतरित केले जाते. सध्याच्या दरानुसार, जर आपण आपल्या भविष्यासाठी दररोज 100 रुपये गुंतविले, तर 15 वर्षांनंतर जेव्हा ते परिपक्व होईल, तेव्हा तुम्हाला 989931 रुपयांची एकमुखी रक्कम मिळेल, जी पूर्णपणे करमुक्त असेल. 15 वर्षांच्या कालावधीत तुमची एकूण ठेवी 5,47,500 रुपये असतील. प्रत्येक आर्थिक वर्षात 500 जमा करणे आवश्यक- ➡️ पीपीएफ खाते चालू ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे. आपण हे न केल्यास खाते निष्क्रिय होऊ शकते. सक्रिय खात्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध नाही. एकदा खाते चालू झाल्यावर ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी वार्षिक 50 रुपये दंड आहे. कर्ज सुविधा देखील उपलब्ध- ➡️ कर्जाच्या सुविधेबद्दल बोलायचे झाल्यास आपण ज्या वित्तीय वर्षात हे खाते उघडले, त्या आर्थिक वर्षाच्या पुढील वर्षापासून कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा पाच वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे. आपण आपल्या खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 25 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळवू शकता. आर्थिक वर्षात एकदाच कर्जाचा लाभ घेता येतो. पहिले कर्ज परतफेड होईपर्यंत दुसरे कर्ज उपलब्ध होणार नाही. तीन वर्षांच्या आत कर्जाची परतफेड केल्यास व्याजदर वार्षिक फक्त 1% असेल. तीन वर्षांनंतर कर्जाची परतफेड केल्यास व्याजदर वार्षिक 6 टक्के राहील. प्री मॅच्युरिटी विड्रॉल रुल्स- ➡️ पैसे काढण्याबद्दल बोलायचे झाल्यास पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर पैसे काढणे एका आर्थिक वर्षात एकदा केले जाऊ शकते. हे आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत असू शकते. खातेदार आजारी पडल्यास किंवा स्वत: च्या किंवा मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता खातेदार खाते बंद करू शकतो. संदर्भ:- tv9marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
7
इतर लेख