योजना व अनुदानलोकमत न्युज १८
लहान मुलांसाठी शिक्षणासाठी LIC ची खास योजना!
➡️ देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ग्राहकांसाठी वेळोवेळी नव्या पॉलिसी आणत असते. तुमच्या आवश्यकतेनुसार LIC दरवेळी विविध पॉलिसी लाँच करते. त्यांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आयुष्याच्या विविध टप्प्यांवर तुम्हाला चांगला रिटर्न मिळवता येतो. अशीच एक पॉलिसी आहे ती म्हणजे 'न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लान'. ही योजना खास लहान मुलांसाठी बनवण्यात आली आहे.
या पॉलिसीतील महत्त्वाचे मुद्दे-
• ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी कमीतकमी वयोमर्यादा 0 वर्षे आहे
• ही विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 12 वर्षे आहे
• या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीतकमी रक्कम 10000 रुपये आहे, जास्तीत कोणतीही मर्यादा नाही आहे
• प्रीमियम वेवर बेनिफिट राइडर हा पर्याय उपलब्ध आहे.
• या पॉलिसीअंतर्गत पॉलिसीधारक अर्थात तुमची मुलं 18, 20 आणि 22 वर्षांची झाल्यानंतर सम अश्यूर्डची 20-20 टक्के रक्कम मिळेल. उर्वरित 40 टक्के रक्कम पॉलिसी होल्डर 25 वर्षांच्या झाल्यावर मिळेल. यावेळी पॉलिसीधारकाला बोनस देखील मिळेल.
मॅच्युरिटी कालावधी
➡️ LIC न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लानची एकूण टर्म 25 वर्षांची आहे.
मॅच्युरिटी बेनिफिट
➡️ पॉलिसीच्या मॅच्यूरिटीवेळी (विमाधारकाचा पॉलिसीच्या कालावधी दरम्यान मृत्यू न झाल्यास) पॉलिसीधारकाला विम्याच्या रकमेची उर्वरित 40 टक्के बोनससहित मिळेल.
डेथ बेनिफिट
➡️ पॉलिसीच्या कालावधी दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल. विशेष म्हणजे एकूण पेमेंटच्या 105 टक्के डेथ बेनिफिट मिळतो. एलआयसीची ही पॉलिसी मुलांच्या शिक्षणासाठी अत्यंत फायद्याची ठरू शकते. मुलांच्या महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणावेळी या पॉलिसीतून बेनिफिट मिळते.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- लोकमत न्युज१८
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.