AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लहान मुलांना होतेय टोमॅटो फ्लू ची लागण, वाचा सविस्तर !
समाचारAgrostar
लहान मुलांना होतेय टोमॅटो फ्लू ची लागण, वाचा सविस्तर !
➡️देशात आजकाल लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वेगाने पसरत आहे. हा वेगाने पसरणारा संसर्ग म्हणजेच टोमॅटो फ्लू हा संसर्ग पाच वर्षांखालील मुलांमध्ये झपाट्याने पसरत आहे. देशात आतापर्यंत या फ्लूची लागण झालेल्या बालकांमध्ये 0 ते 9 वर्ष वयोगटातील बालकांचा समावेश असला तरी या फ्लूमध्ये मुलांमध्ये खूप ताप, जुलाब, सांधेदुखी अशी विविध लक्षणे दिसतात. हा फ्लू आणि त्याची लक्षणे चिकुनगुनिया आणि डेंग्यू सारखीच असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ➡️लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 6 मे रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यात या फ्लूने ग्रस्त मुलाची पहिली केस नोंदवली गेली आणि 26 जुलैपर्यंत टोमॅटो फ्लूने ग्रस्त मुलांची संख्या 82 वर पोहोचली. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील सरकारी रुग्णालयाकडून या फ्लूची लागण झालेल्या 26 बालकांची माहिती देण्यात आली. या मुलांचे वय 1 ते 9 वर्षे दरम्यान आहे. मात्र, एकूण बाधित मुलांमध्ये 1 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. ➡️या आजारात लहान मुलांच्या जीवाला सहसा कोणताही धोका नसतो. मात्र, त्याचा संसर्ग मुलांमध्ये झपाट्याने पसरतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. केरळ व्यतिरिक्त ओरिसा आणि तामिळनाडू राज्यांमध्ये या आजाराचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. मात्र, आतापर्यंत देशातील इतर कोणत्याही राज्यातून या फ्लूचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. ➡️टोमॅटो फ्लू कसा पसरतो : संक्रमित मुलाच्या संपर्कात येणे. संक्रमित वस्तूच्या संपर्कात येणे. जर मुलाने संक्रमित वस्तूंना स्पर्श केल्यानंतर तोंडात हात घातला. ➡️टोमॅटो फ्लूची लक्षणे काय आहेत : उच्च ताप, पुरळ, सांधे दुखी, जंतुसंसर्ग, थकवा, मळमळ, उलट्या, अतिसार, निर्जलीकरण, सांधे सुजणे, संपूर्ण शरीर वेदना यामध्ये खूप ताप, अंगावर पुरळ येणे आणि सांधेदुखी ही लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यावर दिसून येतात, त्यानंतर कालांतराने इतर लक्षणेही दिसू लागतात. टोमॅटो फ्लूची लक्षणे चिकनगुनिया आणि डेंग्यू सारखीच असतात. त्यामुळे या रोगांचा संसर्ग टाळण्यासाठी उपचार आणि प्रतिबंधाचे उपाय देखील सारखेच आहेत. ➡️अशा प्रकारे काळजी घ्या : टोमॅटो फ्लू या आजारापासून जर दूर राहायचे असेल तर, त्यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. यामध्ये मुलाला खाज सुटणार नाही, तसेच मुलांना स्वच्छ ठेवणे, त्यांना नीट विश्रांती देणे तसेच वेळोवेळी पाणी देत राहणे यांसारख्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. संबंधित लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
2
इतर लेख