क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लसूण लागवडीविषयी महत्वाची माहिती!
लसुण लागवड उपयुक्त काळावधी:- • ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात करावी, त्यामुळे डिसेंबर, जानेवारी हा काळ लसणाचा गड्डा भरण्यास अनुकूल असतो. • उशिरा लागवड झाली तर गड्ड्यांचा आकार कमी होतो. वजन कमी भरते व उत्पादनदेखील कमी येते. लसुण पाकळ्या निवड अशी करावी:- • लागवडीसाठी 1.5 ग्रॅम वजनाच्या पाकळ्या वापराव्यात. • पोचट किंवा पिवळसर रंगाच्या, लहान पाकळ्या वापरू नयेत. • त्यामुळे गड्डे उशिरा तयार होतात व उत्पादन घटते. • मागील हंगामात तयार झालेले व थंड आणि कोरड्या जागेत साठवून पुरेशी विश्रांती मिळालेले मोठ्या आकाराचे गड्डे लागवडीसाठी वापरावेत. • हेक्‍टरी सहा क्विंटल बियाणे लागते. • लागवडीसाठी पाकळ्या वेगळ्या करताना वरच्या पापुद्य्राला अथवा पाकळ्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. लसणाच्या पाकळ्या टोकण करून लावाव्या लागतात.
91
19
संबंधित लेख