क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
गुरु ज्ञानकृषी जागरण
लसूण पिकाची लागवड करताय? जाणून घ्या! कोणते आहे सर्वोत्तम वाण..
लसणाची लागवड करण्यासाठी ऑक्टोबर महिना हा उपयुक्त असतो. लसूण लागवडीसाठी जास्त उष्ण हवामान नको असते तसेच जास्त थंडी लसणाला अपायकारक ठरत असते. लसूण लागवडीसाठी ऑक्टोबर महिना सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात केलेल्या लसणाच्या लागवडीमुळे लसणाचे कंद जोमदार उगवतात. असेच काही भरघोष उत्पन्न देणाऱ्या लसणांच्या विविध वाणांविषयीची माहिती आपण आज या लेखात करून घेऊ. लसणाचे विविध वाण 👉 टाईप ५६-४: पंजाब कृषी विश्वविद्यालयाने लसणाची ही जात विकसित केली आहे. या जातीच्या लसणाच्या गाठी छोट्या आकाराच्या असतात व रंगाने सफेद असतात. एका लसणामध्ये २५ ते ३४ पाकळ्या असतात. या जातीचे उत्पन्न हेक्टरी कमीत-कमी दीडशे ते दोनशे क्विंटलपर्यंत मिळते. 👉 को. २: तामिळनाडू कृषी विश्वविद्यालयाने लसणाचे हे वाण विकसित केली आहे. या जातीचा लसूण हा सफेद रंगाचा असतो आणि या जातीच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पादन मिळते. 👉 ३-आईसी ४९३८१: भारतीय कृषी संशोधन संस्थेने ही जात विकसित केली आहे. या जातीचे लसूण १६० ते १८० दिवसांत तयार होते. या जातीमुळे ही शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते. 👉 सोलन: हिमाचल प्रदेश कृषी विश्वविद्यालयाने ही जात विकसित केली आहे. या जातीचा लसूण रुंदी व लांबीने बऱ्यापैकी मोठा असतो. लसणाचा रंग हा गडद असतो. या लसणाच्या प्रत्येक गाठीमध्ये चार पाकळ्या येतात व त्यांचा आकार तुलनेने मोठा असतो. या जातीच्या लागवडीमुळे लसणाचे अधिक उत्पन्न मिळते. 👉 ४- ॲग्री फाउंड व्हाईट ( ४१जी ) या जातीचा लसूण १५० ते १६० दिवसांत तयार होतो. हेक्टरी १३० ते १४० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. या वाणाची बहुतांशी गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये लागवड केली जाते. 👉 यमुना(-१ जी ) सफेद ही जात संपूर्ण भारतात लागवडीसाठी वापरली जाते. अखिल भारतीय भाजीपाला सुधार परियोजनाद्वारे या वाणाला पारित करण्यात आले आहे. या जातीचा लसूण १५० ते १६० दिवसांत तयार होतो. प्रति हेक्टरी उत्पन्न १५० ते १७५ क्विंटलपर्यंत येते. 👉 जी २८२: हा लसूण सफेद आणि मोठ्या आकाराचा असतो. कमीत-कमी १४० ते १५० दिवसांत तयार होतो. उत्पन्न आहे हेक्‍टरी १७५ ते २०० क्विंटलपर्यंत मिळते.
संदर्भ:- कृषी जागरण. हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
111
34
संबंधित लेख