क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
गुरु ज्ञानGOI - Ministry of Agriculture & Farmers Welfare
लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना
अलीकडेच, कृषी विभाग, सहकार व शेतकरी कल्याण व भारत सरकार यांनी लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी काही महत्वाची पावले उचलली आहेत. मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रभाव वाढत गेला, तर त्याला नियंत्रित करणे आवाक्याबाहेर जाईल. त्याचबरोबर उशिरा पेरणी किंवा उशिरा पक्व होणाऱ्या वाणाची लागवड केल्यामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढतो. या अळीचा प्रभाव हा पानांपासून ते मक्याच्या कणसापर्यंत नुकसान करतात. ही लार्व्हा अवस्थेत असताना त्यांचे नियंत्रण करता येते. मात्र या अळीने एकदा का मक्याच्या कणसामध्ये प्रवेश केला, तर त्याचे नियंत्रण करता येत नाही. या किडीचा जवळपास १०० पिकांवर प्रादुर्भाव होतो. जसे की, अन्नधान्य पिके, भाजीपाला, जंगली वनस्पती यावर होतो.
शेतकऱ्याने लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी महत्वाची पावले उचलणे गरजेचे आहे. हंगाम सुरु होण्याचा वेळेस खोल नांगरणी करावी. जेणेकरून कीड सुप्तावस्थेत असताना सूर्यप्रकाशामध्ये नष्ट होईल. मक्यामध्ये आंतरपिके घ्यावीत. उदा . मका+तूर/उडीद/मुग यासारखी पिक अंतरपिक म्हणून घ्यावीत. किडींचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी प्रति एकरी ५ कामगंध सापळे स्थापित करावे. ट्रायकोग्रामा प्रेटीओसम किंवा टेलेनोमास रेमस प्रती एकरी ५०००० प्रति आठवडा सोडावेत. मेटारायझिम अनोस्पोली पावडर@७५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात १०-१५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. प्रभावी नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशक सायनट्रिनीलीप्रोल १९.८%+थायमेथोक्झाम १९.८% @ ४ मिली प्रति किलो बियाण्यांमध्ये बीजप्रक्रिया करावी. त्याचबरोबर रोपावस्थेत असताना अझाडायरेक्टीन १५०० पीपीएम @ ५ मिली प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी. नंतर पिकवाढीच्या अवस्थेत इमामेक्टीन बेन्झोएट @०.४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड @ ०.३ मिली किंवा क्लोरॅणट्रिनीलीप्रोल १८.५% एससी @०.३ मिली प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी. यानंतर किडीवर नियंत्रण करणे कठीण होते, त्यामुळे केलेल्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांनी व्यवस्थापन करावे. लष्करी अळीचे उगमस्थान हे अमेरिकेतील उष्णकटिबंधीय प्रदेशातील आहे. यानंतर याची नोंद आफ्रिकेमधील नायजेरियामध्ये झाल्यानंतर या अळीचा हळूहळू प्रसार मे २०१८ ला भारतामधील कर्नाटक राज्यात प्रादुर्भाव झाला. यानंतर तेलंगाना, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात , तमिळनाडू या राज्यात होत गेला. संदर्भ – कृषी मंत्रालय भारत सरकार आणि सहकार व शेतकरी कृषी कल्याण विभाग जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
191
1
संबंधित लेख