योजना व अनुदानAgrostar
लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होणार विमा!
💸 राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.खरीप हंगामात खराब हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
💸 त्यातील सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पीकविमा वितरण करण्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री यांनी दिली.
💸 विमा रक्कम संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यासाठी विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांना मिळणार असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
💸 राज्याचे कृषीमंत्री यांच्यासोबत विमा कंपन्यांची बैठक घेऊन सरसकट पीकविमा देण्याबाबत भूमिका घेतली होती. तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना केल्या आहेत.
💸 संदर्भ:- AgroStar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.