AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लम्पी रोगावर स्वदेशी लस विकसीत,पंतप्रधानांनी केली घोषणा !
पशुपालनAgrostar
लम्पी रोगावर स्वदेशी लस विकसीत,पंतप्रधानांनी केली घोषणा !
🐄गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात लंपी रोगाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामुळे आता याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. यामुळे आता काळजी घेणे गरजेचे आहे. यावर आता उपाययोजना केल्या जात आहेत. लंपी रोगाचा फैलाव देशातल्या महाराष्ट्रासह इतर 11 राज्यांमध्ये झाला आहे. 🐄यामध्ये हजारो जनावरांचा मृत्यू झाला आहे तर ११ लाखांहून अधिक संक्रमित जनावरे समोर आली आहेत. असे असताना आता जनावरांमधील लंपी या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भारतामधील शास्त्रज्ञांनी लम्पी रोगावर लस तयार केली आहे. या लसीकरणाबरोबरच तपासणी चाचण्यांना वेग देऊन जनावरांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन हा आजार अटोक्यात आणला जाईल. 🐄जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात असून 2025 पर्यंत देशातील प्रत्येक जनावराला तोंडाच्या आणि पायाच्या आजावर लस दिली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिटमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायावर मार्गदर्शन केले जात आहे. जगभरातील 156 तज्ञ हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 🐄संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
2
इतर लेख