AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लम्पीचा धुमाकुळ शेतकऱ्यांनो,अशी घ्या काळजी !
पशुपालनAgrostar
लम्पीचा धुमाकुळ शेतकऱ्यांनो,अशी घ्या काळजी !
🐄शेतकऱ्यांसमोरील संकटाची मालिका सुरूच आहे. देशात लम्पी आजाराने धुमाकूळ घातला आहे. लम्पीमुळे देशात आतापर्यंत एकूण 82 हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूचा आकडा वाढला आहे. राज्यात आतापर्यंत 187 जनावरे या आजाराचे बळी गेले आहेत. 🐄लम्पीला रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच देशभरात लम्पीच्या लसीकरणाला देखील वेग येत आहे. लम्पी या आजारामुळे अचानक गुरे दगावत असल्याने याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. 🐄लंपी व्हायरसवर उपाय : १. लंपीची लागण झालेल्या जनानरांना वेगळे ठेवा. २. माश्या, डास, गोचीड यांना मारून टाका. ३. जनावराचा मृत्यु झाल्यास मृतदेह मोकळ्या जागेवर नसोडता पुरून टाकावा किवा जाळून टाकावा. ४. संपुर्ण गोठ्यात कीटकनाशक फवारावे . 🐄शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी : रोगाची लक्षणे आढळण्यात जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना संपर्क करावा तसेच टोल फ्री क्रमांक 180023301 किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशु सेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा. 🐄संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
5
इतर लेख