AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लंपी आजारामुळे पशुपालकांची चिंता वाढली; अशी घ्या काळजी.
कृषी वार्ताकृषी जागरण
लंपी आजारामुळे पशुपालकांची चिंता वाढली; अशी घ्या काळजी.
पावसाळ्यात जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसात अनेक आजारांचा प्रसार होत असतो. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रसार झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामाच्या दिवसामध्ये जनावरे आजारी होत असल्याने पशुपालक चिंतेत आहेत. दरम्यान या आजाराची लस उपलब्ध नसल्याने पशुपालकांची चिंता अधिक वाढली आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागानेही नियोजन केले असून गावागावत निहिर आयोजित केले आहे. दरम्यान या आजाराशी दोन हात करण्यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. गोठ्यात पाणी साचू देऊ नये यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. गाई-म्हशीमधील सर्व वयाच्या जनावरांना हा आजार रोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. लंपी आजाराची काय आहेत लक्षणे हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरित परिमाण होतो. सुरुवातीस २ ते ३ दिवस जनवारांना बारिक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेंद्रिय आदी भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरांना चालताना त्रास होतो. लंपी आजाराचा संसर्ग न होण्यासाठी काय करावे निरोगी जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी बाधित जनावरे वेगळी बांधावीत. प्रसार बाह्य कीटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या जनावारांना तसेच गोठ्यात डास, माश्या, गोचीड आदींचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक औषधांची फवारणी करावी. देशी वशांच्या जनावरांपेक्षा सकरीत जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. संदर्भ- १९ ऑगस्ट २०२० कृषि जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
87
24
इतर लेख