सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
रोपांची पुर्नलागवड करताना 'या' गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे!
रोपवाटीकेमधून आणलेल्या किंवा घरी तयार केलेल्या रोपांची योग्य प्रकारे पुर्नलागवड करणे गरजेचे असते. योग्य अवस्थेमध्ये व योग्य प्रकारे रोपांची पुर्नलागवड केल्यास रोपांचे नुकसान होत नाही व पीक चांगल्या प्रकारे येऊन अधिक उत्पादन येण्यास मदत होते. पुर्नलागवड करतांना पुढील बाबींचा विचार करणे गरजेचे आहे...  रोपे- • रोपे हि सशक्त व निरोगी असावीत. रोपांवर कुठल्याही प्रकारच्या रोग व किडींचा प्रादुर्भाव नसावा. • रोपांचे वय हे योग्य असावे जास्त दिवसाची झालेली किंवा कमी वयाची असलेली रोपे पुर्नलागवडी साठी वापरू नये. • रोपांचा मूळवा हा योग्य असावा. जास्त दिवस ट्रे मध्ये रोपे राहिल्या मुळे गोळा होतात त्यामुळे व लागवडी नंतर अश्या रोपांची योग्य प्रकारे वाढ होत नाही.  हाताळणी- • रोपांची नर्सरी मधून आणल्या नंतर तसेच लागवडी च्या वेळी योग्य प्रकारे हाताळणी करावी. • ट्रे मधून रोपे काढताना व लागवड करताना रोपांची मूळे व बुड तुटणार नाही किंवा त्याला जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.  हार्डनिंग- • रोपे नर्सरी मधून आणल्या नंतर लगेच रोपांची पुर्नलागवड करू नये. • रोपांना संरक्षित जागेमध्ये ठेवावे व त्यांना योग्य सूर्यप्रकाश व सावली मिळेल याची काळजी घ्यावी. रोपांच्या अवस्थेनुसार योग्य पाणी व्यवस्थापन करावे. • लागवडीनंतर बाहेरील वातावरणाचा रोपांवर परिणाम होऊ नये म्हणून हार्डनिंग करणे गरजेचे आहे. • पाणी व खत व्यवस्थापन- • पुर्नलागवाडी नंतर योग्य प्रकारे पाणी द्यावे पाणी कमी पडल्यास रोपे सुकतात व अतिशय जास्त झाल्यास रोपांची मर होते त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी द्यावे. • पुर्नलागवड केल्यानंतर लगेच पाण्याद्वारे किंवा वाफ्यामध्ये झाडाजवळ जास्त प्रमाणात खत देऊ नये त्याने झाडास हानी पोहचू शकते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
78
26
संबंधित लेख