AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रोज 7 रुपये गुंतवा आणि दरमहा ₹ 5,000 मिळवा !
योजना व अनुदानAgrostar
रोज 7 रुपये गुंतवा आणि दरमहा ₹ 5,000 मिळवा !
➡️भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या एका अतिशय चांगल्या योजनेबद्दल सांगणार आहोत.सरकारची अटल पेन्शन योजना तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेंतर्गत पती-पत्नी स्वतंत्र खाते उघडून दरमहा 10,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकतात. या योजनेचे आणखी बरेच फायदे आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.अटल पेन्शन योजना काय आहे? ➡️अटल पेन्शन योजना ही अशी सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वयानुसार गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला 1,000 ते 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. ➡️या योजनेत कसे सामील व्हावे : या योजनेत सामील होण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडावे लागेल. तुमचे आधीच खाते असले तरीही तुम्ही या योजनेत सामील होऊ शकता. या योजनेत, तुम्हाला दरमहा 210 रुपये म्हणजेच दररोज 7 रुपये गुंतवावे लागतील. तुम्हाला हे पैसे सुमारे 20 वर्षे गुंतवावे लागतील. गुंतवणुकीची मॅच्युरिटी झाल्यानंतर आणि तुम्ही वयाची 60 वर्षे ओलांडताच, सरकार तुम्हाला प्रति वर्ष 60 हजार दराने म्हणजे दरमहा 5 हजार रुपये पेन्शन देण्यास सुरुवात करेल. यामुळे तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
57
7
इतर लेख