योजना व अनुदानmarathi news24
रोज 50 रुपये जमा करा आणि 35 लाख मिळवा!
➡️शेतकऱ्याच्या फायद्यासाठी बँकेत तसेच पोस्ट ऑफिस आणि पतपेढी त्यासोबत सोसायटी यामध्ये अनेक शेतकरी फायद्यासाठी असंख्य योजना उपलब्ध आहेत. तर आज या लेखात पोस्टाने शेतकऱ्याच्या आर्थिक विकासासाठी एक जबरदस्त योजना काढली आहे त्या विषयी सविस्तर माहिती पाहू.
➡️पोस्टाने शेतकरी वर्गाच्या गुंतवणुकीसाठी तसेच चांगला परतावा मिळावा यासाठी एक जबरदस्त योजना काढली आहे.या साठी तुम्हाला पोस्टाच्या ग्राम विकास योजनाया मध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे. ग्राम विकास योजना ही शेतकरी वर्गाच्या फायद्यासाठी असल्याने शेतकरी वर्गाला गुंतवणूक करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे.
➡️ग्राम विकास योजनेत तुम्ही छोटी रक्कम गुंतवुन मोठी रक्कम मिळवू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत अल्प अशी रक्कम आहे त्यामुळे गरीब मध्यमवर्गीय शेतकरी याचा फायदा अगदी सहजपणे घेऊ शकतात. भविष्यासाठी ही गुंतवणूक अत्यंत चांगली आहे.
➡️या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय १९ ते ५५ या दरम्यान असायला हवे तसेच तुम्ही भारतीय देशाचे नागरिक असणे अनिवार्य आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही १० हजार रुपये ते १० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तसेच या योजनेचा हप्ता हा ३ महिने ६ महिने किंवा १२ महिने याच्या कालांतराने भरू शकता.
➡️मोबदल्याची रक्कम ही त्या व्यक्तीला वयाची ८० वर्ष पूर्ण झाल्यावर त्याच्याकडे दिली जाते. तर दुसरीकडे, यादरम्यान जर का एकाद्या गुंतवूकदाराचा मृत्यू झाल्यास, ही सर्व रक्कम त्या व्यक्तीच्या पुढील पिढीला दिले जाते.तसेच महत्वाचे म्हणजे ग्राम विकास योजनेच्या या पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इंडिया पोस्टने ऑफर केलेला बोनस आणि प्रतिवर्ष रु. १,००० प्रति ६० रुपये निश्चित केलेला अंतिम घोषित बोनस.
संदर्भ:-Krishi jagran,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.