AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रोजगाराची नवी संधी निर्माण करणारी योजना!
योजना व अनुदानAgrostar
रोजगाराची नवी संधी निर्माण करणारी योजना!
👉🏻महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मध केंद्र योजना राबवत आहे. त्यामुळे मध केंद्र योजना ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याबरोबर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार ही निर्माण होईल. 👉🏻योजनेची वैशिष्ट्ये : या योजनेंतर्ग मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक अशाप्रकारे या योजनेचे स्वरुप आहे. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यात येतो. विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा देण्यात येते. मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करण्याचे काम या योजनेंतर्गत करण्यात येते. 👉🏻अटी व शर्ती : लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपूर्वी लाभार्थींनी 50 टक्के स्वगुंतवणूक रक्कम भरणा करणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. 👉🏻योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता 👉🏻वैयक्तिक मधपाळ - - १० पास असणे गरजेचे आहे - २४ हजार रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक - २४ हजार रुपयांची साहित्य आणि साधने मिळणार आहे. - या योजनेचा लाभ घेण्यासाठी १० दिवसांचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक 👉🏻केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ - - २१ वर्ष पूर्ण - १० पास असणे गरजेचे आहे. - किमान १ एकर जमीन असणे आवश्यक आहे. - जमीन स्वतः ची नसल्यास भाडे तत्वावर घेणे. - मधमाशा पालन प्रशिक्षण, मधमाशा प्रजनन सुविधा असणे आवश्यक. 👉🏻केंद्र चालक संस्था - - ही संस्था कायद्याने नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. - मधमाशा पालन प्रशिक्षण, मधमाशा प्रजनन सुविधा असणे गरजेचे आहे. - संस्थेकडे स्वतः ची किंवा भाड्याने घेतलेली १००० चौरस फूट इमारत आणि १ एकर जमीन पाहिजे. 👉🏻विशेष छंद प्रशिक्षण - - २५ रुपये फी आकारण्यात येईल. - अर्ज करण्याकरिता सर्वजण पात्र आहेत. - ५ दिवस शासकीय प्रशिक्षण देण्यात येईल. - आग्या मध संकलन प्रशिक्षण - १८ ते ५० वयोगटातील आणि साक्षर व्यक्ती यासाठी पात्र. - ५ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येईल. 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
1