क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखकृषी जागरण
रोगमुक्त उत्पादनासाठी करा पिकांची फेरपालट; किडींचा प्रादुर्भाव कमी होऊन वाढेल उत्पन्न!
पिकांना वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. यामुळे पिके घेताना ती वेगवेगळ्या प्रकारची लावली तर आपण जमिनीतील वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचा पुरेपूर वापर करू शकतो. यासाठी पिकांची फेरपालट करणे खूप गरजेचे आहे. पिकांची फेरपालट :- एकाच शेतात वेगवेगळ्या पिकांची लागवड करत राहणे किंवा एकाच वेळी शेतात वेगवेगळ्या पिकांची लागवड करणे म्हणजेच पिकांची फेरपालट होय. एकामागून एक लागवड :- या पद्धतीत एका पिकापाठोपाठ दुसरे पीक घेतले जाते. यामुळे जमिनीमधील असणाऱ्या अन्नद्रव्यांचा पुरेपूर वापर होतो. प्रत्येक पिकांवर वेगवेगळ्या प्रकारची कीड आणि रोग पडत असल्याने एका पिकाची कीड किंवा रोग नंतरच्या पिकावर पडण्याची शक्यता कमी असते. यामुळे दुसरे पीक लागवड करत असताना असे निवडावे की, पहिल्या पिकावर लागणारी कीड व रोग या पिकावर पडणार नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास सोयाबीन पिकावर लागणारी कीड व रोग गहू पिकावर पडत नाही आणि गव्हावरील कीड व रोग भुईमूग या पिकावर पडत नाही. एकाच वेळी वेगवेगळ्या पिकांची लागवड :- एकाच हंगामात शेतकरी विविध पिकांची लागवड करतात. अशावेळी पिकांची निवड करताना तृणधान्य, दाळवर्गीय, नगदी पिके आणि जनावरांचा चार पुरविणाऱ्या पिकांचा समावेश असावा. आंतरपीक घेणे हे फायद्याचे ठरू शकते. यामुळे जमीन, पाणी आणि अन्नद्रव्य यांचा योग्य वापर होतो आणि कमी जमिनीत जास्त उत्पादन मिळते. सोबतच पिकांचे कीड व रोगापासून संरक्षण होते. संदर्भ:- कृषी जागरण, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
11
3
संबंधित लेख