AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रेशीम उत्पादकांसाठी मोठी बातमी; राज्य सरकारकडून ६२.७४ लाख रुपयांचा निधी वितरित
कृषी वार्ताकृषी जागरण
रेशीम उत्पादकांसाठी मोठी बातमी; राज्य सरकारकडून ६२.७४ लाख रुपयांचा निधी वितरित
• राज्यातील रेशीम बीज कोष उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कोषाची रक्कम अदा करण्यासाठी व नवीन अंडी पूंज निर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारकडून ६२.७४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. • या संदर्भात राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावर यांनी सदर निधी वितरित करण्यास मान्यता दिली. त्यानुसार सदर निधी नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे संचालक यांना वितरित करण्यात आला आहे. • राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार अंडीपुंजाचा पुरवठा व्हावा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे महाराष्ट्र सरकारचे तुती अंडीपुंज निर्मिती केंद्र आहे. • अंडी पुंज तयार करण्यासाठी बीज कोषाची खरेदी या केंद्रामार्फत करण्यात येते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व आसपासच्या परिसरातील शेतकरी तुती रेशीम तसेच गडचिरोली ,भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थी किंवा लाभार्थी शेतकरी टसर रेशीम कोषाचे उत्पादन घेऊन अंडीपंजू केंद्रामध्ये विक्री करतात. • कोरोनामुळे ही निर्मिती केंद्र बंद होते, मात्र रेशीम संचालनालयामार्फत शेतकऱ्यांना अंडीपुंजाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता. • यादरम्यान राज्यातील रेशीम बीज कोष उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कोषाची रक्कम करण्यासाठी शासनामार्फत निधीची आवश्यकता होती. • याबाबत मुंबई येथे वस्त्रोद्योग राज्यमंत्री यड्रावर यांच्याप्रमुख उपस्थितीत रेशीम कोष संदर्भात केंद्र शासनाकडून आलेल्या निधीमध्ये राज्य सरकार सहभाग अनुदानाची तरतुद करणे बाबत आढावा बैठक पार पडली. संदर्भ - ८ ऑक्टोबर २०२० कृषी जागरण यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
6
3